फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महिला T20 विश्वचषक २०२४ ची चर्चा सध्या जगभरामध्ये सुरु आहे. भारताच्या संघाने मागील दोन सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, टीम इंडिया हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक खेळत आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. आता भारतीय संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यत एकही या विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे भारताच्या संघासाठी ऑस्ट्रेलियाचा मोठे आव्हान असणार आहे. नजर भारत ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाच्या हेड टू हेड आकडेवारीवर.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यत कांगारूंच्या संघाचे पारडं जड दिसत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन संघ ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने फक्त ७ सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने २५ सामने जिंकले आहेत. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाला न्यूझीलंडच्या संघाने पराभूत केलं होत. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाच्या संघाने पराभूत केलं आहे, आणि संघ आता गुणतालिकेमध्ये घसरला आहे. सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलिया संघाचे सामना जिंकल्यामध्ये 73.52 टक्के चान्स आहेत, तर भारतीय महिला संघाचे 20.58 टक्के चान्स आहेत.
स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर, श्रेयंका पाटील, आशा जॉय, हरलीन देओल, यास्तिका भाटिया, मेघना सिंग, अमनजो. कौर
अलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ॲश गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा (विकेटकिपर), सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, ॲनाबेल सदरलँड, टायला व्लेमिंक, जॉर्जिया वेरहम