Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Boxing Championship 2025 : भारताच्या लेकींनी देशाचा अभिमान वाढवला, 4 मेडल केले पक्के! बातमी सविस्तर वाचा…

भारताच्या मुलींनी आता देशासाठी ४ पदके निश्चित केली आहेत. जास्मिन लांबोरिया जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय ठरली. यानंतर नुपूर शेओरननेही अंतिम फेरीत प्रवेश केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 13, 2025 | 11:09 AM
फोटो सौजन्य - Sports India

फोटो सौजन्य - Sports India

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप : भारतामध्ये क्रिकेट पसंत केले जाते त्याचबरोबर कब्बडी देखील भारतामध्ये पाहिली जाते. पण इतर खेळांना फार काही महत्व दिले जात नाही. सध्या बॅटमिटनचे सामने सुरु आहेत तर काही ठिकाणी आर्चरीचे देखील स्पर्धा सुरु आहेत. त्याचबरोबर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे देखील सामने सुरु आहेत. लिव्हरपूलमध्ये सध्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप सुरू आहे. ज्यामध्ये भारतीय महिला बॉक्सर्सनी उत्तम कामगिरी दाखवली आहे. 

भारताच्या मुलींनी आता देशासाठी ४ पदके निश्चित केली आहेत. जास्मिन लांबोरिया जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय ठरली. यानंतर नुपूर शेओरननेही अंतिम फेरीत प्रवेश केला. आता देशाला या दोन्ही बॉक्सर्सकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. त्याच वेळी, मीनाक्षी हुड्डाने उपांत्य फेरीत पोहोचून भारतासाठी चौथे पदक निश्चित केले आहे. 

Jaismine enter Final of world Boxing Championship 2025

Jaismine Lamboria beat Omailyn Alcalá (VEN) by 5-0 to enter Women’s 57 kg final

She became 7th Indian boxer to reach World Boxing championship final

She will face 24 Olympic 🥈 Julia Szeremeta (POL) for gold medal pic.twitter.com/tAqNEeT945

— Sports India (@SportsIndia3) September 12, 2025

जास्मिन आणि नुपूर अंतिम फेरीत

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला बॉक्सर जास्मिन लम्बोरियाचा सामना व्हेनेझुएलाच्या अल्कालाशी झाला. सेमीफायनलमध्ये जास्मिनने अल्कालाचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आता अंतिम फेरीत जास्मिनचा सामना पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या ज्युलिया झेरेमेटाशी होईल. महिलांच्या ८० किलो वजनी गटात तुर्कीच्या सेमा दुतातासचा ५-० असा पराभव करून नुपूरने अंतिम फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीत नुपूरने सुरुवातीपासूनच तुर्कीच्या बॉक्सरवर वर्चस्व गाजवले. यापूर्वी भारताच्या पूजा राणीने ८० किलो वजनी गटात देशासाठी पदक निश्चित केले होते. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताच्या मीनाक्षीने इंग्लंडच्या अ‍ॅलिस पम्फ्रेचा ५-० असा एकमताने पराभव केला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर आता मीनाक्षीचा सामना उपांत्य फेरीत मंगोलियाच्या रौप्यपदक विजेत्या लुत्सैखानी अल्तांटसेत्सेगशी होईल.

Asia Cup Points Table : आशिया कपच्या गुणतालिकेच उलथापालथ! संघाच्या रॅंकिंगमध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या

भारतीय पुरुष बॉक्सर्सची खराब कामगिरी

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मुलींनी देशाला अभिमानाने गौरव दिला आहे, परंतु भारतीय पुरुष बॉक्सर्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. २०१३ पासून भारतीय पुरुष बॉक्सर्सचा १० सदस्यीय संघ कोणत्याही पदकाशिवाय परतला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही भारतीय पुरुष बॉक्सरला पदक जिंकता आलेले नाही. भारताची स्टार निकहत जरीन हिने देखील निराश केले. तिने पहिला सामना जिंकला होता त्यानंतर तिला दुसऱ्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

Web Title: World boxing championship 2025 indian women made the country proud secured 4 medals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup Points Table : आशिया कपच्या गुणतालिकेच उलथापालथ! संघाच्या रॅंकिंगमध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या
1

Asia Cup Points Table : आशिया कपच्या गुणतालिकेच उलथापालथ! संघाच्या रॅंकिंगमध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या

BAN VS SL : श्रीलंकेसाठी बांगलादेशचे आव्हान सोपे नसणार, नजर फिरकीपटूंवर असेल! कोण मारणार बाजी?
2

BAN VS SL : श्रीलंकेसाठी बांगलादेशचे आव्हान सोपे नसणार, नजर फिरकीपटूंवर असेल! कोण मारणार बाजी?

ENG VS SA : फिल्ल सॉल्ट रन मशीन, इंग्लंडने पहिल्या सामन्याचा हिशोब घेतलाच! दक्षिण आफ्रिकेला 146 धावांनी केलं पराभूत
3

ENG VS SA : फिल्ल सॉल्ट रन मशीन, इंग्लंडने पहिल्या सामन्याचा हिशोब घेतलाच! दक्षिण आफ्रिकेला 146 धावांनी केलं पराभूत

अख्तर, गंभीर, हरभजन आणि आफ्रिदी…; IND vs PAK सामन्यापूर्वी मैदानातील ‘या’ 6 मोठ्या वादांची चर्चा; वाचा सविस्तर
4

अख्तर, गंभीर, हरभजन आणि आफ्रिदी…; IND vs PAK सामन्यापूर्वी मैदानातील ‘या’ 6 मोठ्या वादांची चर्चा; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.