
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
WPL 2026 MI W vs DC W Live Streaming : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) चा चौथा हंगाम सुरू झाला आहे. दुसऱ्या दिवशी लीगचा उत्साह दुप्पट होणार आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स महिलांचा सामना यूपी वॉरियर्स महिलांशी होईल. संध्याकाळी मुंबई इंडियन्स महिलांचा सामना दिल्ली कॅपिटल्स महिलांशी होईल. आज दोन सामने खेळवले जाणार आहेत.
चौथ्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला आहे. आज रविवारी दोन सामने खेळवले जाणार आहेत, पहिला सामना हा गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, तर दुसरा सामना एमआय विरुद्ध डीसी यांच्यातील WPL 2026 चा तिसरा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल आणि भारतीय चाहते टीव्ही आणि मोबाईलवर हा सामना कसा पाहू शकतात ते जाणून घेऊया.
WPL २०२६ चा तिसरा आणि चौथा सामना कधी खेळला जाईल?
WPL २०२६ चे दोन्ही सामने हे रविवारी 10 जानेवारी रोजी खेळवले जाणार आहेत. हे सामने वेगवेगळ्या वेळेला खेळवले जाणार आहेत.
मुंबई इंडियन्स महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यातील WPL 2026 चा तिसरा सामना कुठे खेळला जाईल?
मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला आणि गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यातील WPL 2026 चा तिसरा आणि चौथा सामना नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला जाईल.
मुंबई इंडियन्स महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यातील WPL 2026 चा तिसरा सामना किती वाजता सुरू होईल?
WPL २०२६ चा दुसरा सामना हा गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यातील आजचा पहिला सामना हा दुपारी खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे, तर या सामन्याचे नाणेफेक 2.30 मिनिटांनी होणार.
WPL २०२६ चा तिसरा सामना मुंबई इंडियन्स महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल आणि टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल.
𝐒𝐌𝐀𝐒𝐇 𝐌𝐎𝐃𝐄: 𝐎𝐍 💥 When power hitters step in, the ball doesn’t just travel – it flies. 🚀 Watch #UPWvGG 👉 SAT, 10th JAN, 2 PM! pic.twitter.com/jg5PjKdSVg — Star Sports (@StarSportsIndia) January 10, 2026
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यातील WPL २०२६ चा दोन्ही सामने टीव्हीवर कसे पाहायचे?
WPL २०२६ 11 जानेवारी दोन्ही सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकता. तुम्ही WPL २०२६ च्या या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग तुमच्या मोबाईल फोनवर Jio Hotstar अॅपवर पाहू शकता.