WTC 2025 Final: Australia's Starc makes a cry; Kangaroos in strong position, South Africa needs 282 runs to win.
SA vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने उभे आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. २१२ धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाकडे ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यापुढे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर २०७ धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाकडे आता २८१ धावांची आघाडी आहे. साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर २८२ धावा कराव्या लागणार आहे.
हेही वाचा : IND Vs END : गौतम गंभीरबाबत वाईट बातमी; इंग्लंडसोडून प्रशिक्षकाने तात्काळ गाठला देश, वाचा सविस्तर..
खेळाच्या दुसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर रोखून ऑस्ट्रेलियाने ७४ धावांची आघाडी घेऊन फलंदाजीसाठी मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाची दुसरी पारीची सुरवात मात्र चांगली झाली नाही. अॅलेक्स कॅरी आणि मिशेल स्टार्क वगळता कुणालाच मैदनावर स्थिरावता आले नाही. मार्नस लाबुशेन(२२), स्टीव्ह स्मिथ(१३), ट्रॅव्हिस हेड(९), ब्यू वेबस्टर(९), पॅट कमिन्स(६), नॅथन लायन(२) हे खेळाडू स्वस्तात बाद झाले. साऊथ आफ्रिकेच्या कगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी या दोन वेगवान गोलंदाजांनी सुरवातीला आपला दबदबा राखला. परंतु तिसऱ्या दिवशी मात्र साऊथ आफ्रिकेचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कसमोर निष्प्रभ दिसून आले. त्याने स्टार्कने १३६ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थतीत पोहचवले. तसेच अॅलेक्स कॅरीने देखील ५० चेंडूत ४३ धावा करून डाव सावरला. तर जोश हेझलवुड ५३ चेंडूत १७ धावा करून स्टार्कला चांगली साथ दिली.
साऊथ आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर लुंगी एनगिडी ३ विकेट्स घेण्यात यश मिळवले. मार्को जानसेन आणि वियान मुल्डरसह एडेन मार्कराम यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. तर केशव महाराजला या डावात देखील विकेटने हुलकावणी दिली.
हेही वाचा : क्रिकेटमध्ये तीन स्टंम्पचं का वापरले जातात? रंजक आहे इतिहास
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.