फोटो सौजन्य - iStock
क्रिकेटमध्ये तीनच स्टम्प्स का असतात? : भारतामध्ये क्रिकेट म्हणजेच फक्त एक खेळ नाही एक सण म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये क्रिकेट हा एक उत्सव आणि धर्म म्हणून साजरा करतात. भारताची संघाने 2024 आणि 2025 मध्ये दोन आयसीसी ट्रॉफी नावावर केल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने मागील दोन वर्षांमध्ये दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारताचा संघ आगामी मालिका हे इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे यासाठी भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे.
नुकतीच भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग पार पडली यामध्ये आरसीबीच्या संघाने जेतेपद जिंकले. बीसीसीआय ही जगभरामधील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोट्यावधी पैशांची उधळण केली जाते. क्रिकेटमध्ये तीन फॉरमॅट खेळली जातात यामध्ये t20, एकदिवसीय आणि कसोटी असा आहेत. त्याचबरोबर बॅट आणि बॉल हे दोन महत्त्वाचे साधन ते खेळ खेळण्यासाठी लागतात. क्रिकेटमधला आणखी एक सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजेच मैदानात असलेले स्टंप.
क्रिकेटमध्ये तीन स्टंपच सामने खेळताना वापरले जातात यामागील कारण त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. पूर्वी क्रिकेट खेळताना खेळामध्ये दोन स्टंप वापरले जात होते आणि त्या दोन स्टंपवर एकच बेल ठेवली जात असे. आपण बऱ्याचदा पाहिले आहे की स्टंपवर असलेल्या बेल पडल्या की अंपायर फलंदाजांना बाद घोषित करतो. पण अनेकदा असेही झाले आहे की चेंडू स्टंपला लागूनही बेल पडत नाहीत अशा वेळी फलंदाज नाबाद असतो हा क्रिकेटचा नियम आहे.
१९७३ मध्ये झालेल्या केंट विरुद्ध सर यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना झाला होता या झालेल्या क्लब सामन्यामध्ये स्टॅम्पची रूपरेषा बदलण्यात आली होती. या सामन्यामध्ये जो स्मॉल हा फलंदाजी करत होता तर लांपी स्टीवन हा गोलंदाजी करत होता. यावेळी ही दोघे खेळत असताना सलग ३ चेंडू हे स्टॅम्पच्या मधून गेले. यानंतर क्रिकेटमध्ये मधला स्टॅम्प असणे गरजेचे आहे त्याचबरोबर एक मोठी बेल न ठेवता त्याचे रूपांतर २ बेलमध्ये रूपांतर करावे असा नियम करण्यात आला होता. त्यानंतर स्टॅम्पच्या उंचीमध्ये देखील सुधारणा करण्यात आली.
नवीन सुदरनेनुसार स्टॅम्प हे २८ इंच असणे गरजेचे आहेत त्याचबरोबर स्टंपमधील अंतर हे बॉलच्या मापाईतके करण्यात आले. सध्या आता आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर लीग स्तरावर जे सामने खेळले आणि जातात आणि त्याच्यामध्ये जे लायटिंग स्टॅम्प वापरले जातात त्याची लाखो रुपयांमध्ये किंमत आहे.