गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs END : टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये पोहचला आहे. २० जूनपासून या मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची धुरा युवा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडिया गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली आणि गिलच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु, अशातच प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल वाईट बातमी समोर आली आहे. गौतम गंभीरच्या आईला हृदयविक्राराचा झटका आला आहे.
हेही वाचा : IND Vs END : गोलंदाजी विभागावर भारतीय संघाचे असणार लक्ष; ‘या’ दोन गोलंदाजांमध्ये रंगणार स्पर्धा..
गौतम गंभीरच्या आईच्या हृदयविक्राराचा झटका आल्याने गंभीर मालिका सोडून इंग्लंडहून भारतात परतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. तिथे ती डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. अशा परिस्थितीत गंभीर भारतात किती काळ थांबणार आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
भारत पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला आंतर-संघ सामने खेळणार आहे. हा सामना १३ ते १६ जून दरम्यान खेळला जाणार आहे. या काळात, टीम मॅनेजमेंट एक चांगले टीम कॉम्बिनेशन शोधाणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यात महत्वाची भूमिका बाजावाणार होते. पण आता त्यांच्या अनुपस्थितीत, उर्वरित सपोर्ट स्टाफला हे काम [पूर्ण करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत, गौतम गंभीर २० जूनपूर्वी टीम इंडियामध्ये सामील होणार आही.
हेही वाचा : WTC 2025 Final : केरीची हुशारी फसली, डेव्हिड बेडिंगहॅमचा मोठा डाव; अख्खे स्टेडियम झाले आश्चर्यचकित..
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अहमदाबाद विमान दुर्घटनेवर प्रतिक्रियासमोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर विराटने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “आज अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला आहे. मी या अपघातातील बळींसाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझी संवेदना आहे.” अशी भावना विराटने व्यक्त केली. तसेच रोहित शर्माने देखील या घटनेवर शोक व्यक्त केला. शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “अहमदाबादहून खूप दुःखद बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात जीव गमावलेल्या सर्व लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.”