Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC 2025 Final : दक्षिण आफ्रिकेचा विजय तर दुसऱ्या दिवशीच निश्चित! Aiden Markram ची खेळी केवळ एक औपचारिकता..

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियालाला धूळ चारत विजेतेपद पटकावले आहे. या विजयाचा हीरो एडन मारक्रम ठरला आहे. परंतु, स्टिव स्मिथची विकेट देखील हा विजय निश्चय करणारी ठरली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 14, 2025 | 06:37 PM
WTC 2025 Final: South Africa's victory is certain the next day! Aiden Markram's innings is just a formality..

WTC 2025 Final: South Africa's victory is certain the next day! Aiden Markram's innings is just a formality..

Follow Us
Close
Follow Us:

WTC 2025 Final : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून  विजेतेपदावर नाव कोरले आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर एडेन मार्करामने एक अविश्वसनिय खेळी खेळली.  त्याने २०७ चेंडूचा सामना करत १३६ धावा केल्या. त्याच्या खेळीने संघाचा विजय सहज केला. परंतु, असे असून देखील या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय हा  ऑस्ट्रेलियाच्या डावामध्येच निश्चित झाला असल्याचे समोर आले आहे.

एनगिडीचा तो चेंडू आणि स्मिथचा बळी..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला माघारी धाडले. दुसऱ्या डावात स्मिथला १३ धावांवर एलबीडब्ल्यू बाद देण्यात आले. हा प्रकार गुरुवार, १३ जून रोजी खेळच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात घडला. पहिल्या फलंदाजीत खराब कामगिरी केल्यानंतर, कागिसो रबाडाने चहापानाच्या ब्रेकपूर्वी दोन विकेट काढून दक्षिण आफ्रिकेला पुन्हा खेळात परत  आणले. मार्को जॅन्सनने मार्नस लाबुशेनला झटपट बाद करून ऑस्ट्रेलियावर दबाव आणला. पहिल्या डावात अर्धशतक ठोकून स्मिथने संघाच्या धाव संखेत महत्त्वाचे योगदान दिले.

हेही वाचा : WTC 2025 Final : अखेर २७ वर्षांनंतर South Africa ची स्वप्नपूर्ती; कांगारूंना धूळ चारत प्रोटीज संघ बनला ‘World Test Champion’

स्मिथ गेम कुठे झाला?

प्रथम लुंगी एनगिडीने स्मिथला एलबीडब्ल्यू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने सतत स्टंपवर चेंडू  टाकण्यास सुरवात केली.परंतु, त्याला एकही बळी मिळवता आला नाही. स्मिथने १९ व्या षटकाचा शेवटचा चेंडू चुकवला आणि चेंडू थेट जाऊन  पॅडवर आदळला. स्मिथला वाटले की चेंडू आत येईल, परंतु तसे घडले  नाही. सुरुवातीला पंचांनी दक्षिण आफ्रिकेचे अपील स्वीकारले नाही, परंतु एनगिडीने स्वतः अपील केले. त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने पहिल्या डावातील चूक टाळली. त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि स्मिथ बाद झाल्याचे दिसून आले. पहिल्या डावात स्मिथने एनगिडीला चांगलेच धुतले होते, त्याच्या १० चौकारांपैकी त्याने एनगिडीच्या चेंडूंवर तीन चौकार लगावले होते.  स्मिथची विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ चांगलाच अडचणीत आलेला दिसून आला.

हेही वाचा : पाकिस्तानला मोठा झटका! आणखी एका प्रशिक्षकाचा संघाला टाटा, बाय-बाय; PCB चा वाद चव्हाट्यावर..

अखेर दक्षिण आफ्रिका कांगारूंना धूळ चारत बनली ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना पार पडला. सगळ्या क्रीडा जगताच्या नजरा या फायनल सामान्याकडे लागून होत्या. साऊथ आफ्रिकेने हा सामना ५ विकेट्सने जिंकून इतिहास रचला आहे. १९९८ नंतर पहिल्यांदा आयसीसीची स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या २८१ च्या टार्गेटला साऊथ आफ्रिका संघाने एडन मारक्रमच्या १३६ धावांच्या   जोरावर पूर्ण केले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. एडण मारक्रम आणि साऊथ आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बवुमा ही जोडी या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

.

Web Title: Wtc 2025 final south africas victory is certain the next day aiden markrams innings is a formality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • Aiden Markram
  • Steve Smith
  • Temba Bavuma
  • WTC 2025 Final

संबंधित बातम्या

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
1

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!
2

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना
3

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! ‘या’ तीन दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वगळले
4

AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! ‘या’ तीन दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वगळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.