Pakistan Cricket team : पाकिस्तान क्रिकेट नेहमीच काही एक कारणांनी चर्चेत असते. गेल्या एका वर्षापासून प्रशिक्षकाबाबत अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित आणखी एक खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांनी फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. मोहम्मद युसूफ यांच्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी होती.
मोहम्मद युसूफ यांच्या राजीनाम्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप काही एक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, युसूफ यांनी राजीनाम्याबद्दल सांगितले की पीसीबीने गेल्या आठवड्यातच त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. युसूफ यांनी म्हटले आहे की, राजीनामा देण्याचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. तसेच टे म्हणाले की, त्यांनी सांगितले की ते याबद्दल अधिक काही सांगू आणि बोलू इच्छित नाहीत.
पाकिस्तानचे सर्वात विश्वासू फलंदाज असलेले मोहम्मद युसूफ क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोचिंगमध्ये सक्रिय झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते एनसीएचे फलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी केवळ अंडर-१९ संघासोबतच नव्हे तर पाकिस्तानच्या वरिष्ठ संघासोबतही फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान पाकिस्तान संघाला अनेक चांगले फलंदाज मिळाले.
मोहम्मद युसूफच्या निवृत्तीबद्दल एका विश्वसनीय सूत्रानकडून सांगण्यात आले आहे की, माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांना एनसीएचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या निर्णयावर युसूफ नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची ज्येष्ठता बघितली तर त्यांना या पदावर बढती मिळायला हवी होती, असे युसूफ यांचे मत होते. या नाराजीमुळे त्यांनी राजीनामा सादर केल्याचे बोलले जाता आहे. तो राजीनामा आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील स्वीकारला आहे.
हेही वाचा : बाईईईई काय हा प्रकार… इकडे जाऊ की तिकडे! खेळाडू गोंधळला अन् गमावली विकेट
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ यांनी पाकिस्तानसाठी एकूण ३८१ सामने खेळले आहेत. तर ९० कसोटी सामने खेळून त्यांनी या सामन्यांमध्ये त्यांनी ५२.२९ च्या सरासरीने ७५३० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यांनी २४ शतके देखील लागावली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी २८८ सामन्यांमध्ये ४१.७२ च्या सरासरीने १२९४२ धावा केल्या आहेत. या काळात त्यांनी १५ शतके आणि ६४ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्यांनी तीन टी-२० सामने खेळले आहेत.