'This is the bond..', Yashasvi Jaiswal will not leave Mumbai; MCA took 'this' big decision
Yashasvi Jaiswal will not leave MCA : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आगामी स्थानिक हंगामात मुंबईकडून खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्याचे ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. जयस्वालने मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यानंतर तो गोव्याला जाणार होता पण नंतर त्याने आपला निर्णय बदलला असून आता तो मुंबई संघाकडून खेळताना दिसणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या निर्णयाला दुजोरा दिला आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, “आम्ही जयस्वालचे ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि तो आगामी स्थानिक हंगामात मुंबईसाठी उपलब्ध असणार आहे. जयस्वाल सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये त्याने पहिल्या सामन्यात शतकासह या दौऱ्याची शानदार सुरुवात केली होती, परंतु नंतर चार झेल चुकवल्यामुळे त्याची कामगिरी निराशाजनक दिसून आली.
एप्रिलमध्ये, जयस्वालला गोव्याकडून खेळण्यासाठी एमसीएकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले होते. गोव्याने त्याला संघाचे नेतृत्व करण्याची ऑफर देखील दिली होती आणि तो रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीसाठीही पात्र ठरला होता. त्यावेळी जयस्वाल म्हणाला होता की, “गोव्याने मला एक नवीन संधी दिली आहे आणि मला नेतृत्वाची भूमिका बाजवण्यास सांगितले आहे. माझे पहिले ध्येय हे भारतासाठी चांगली कामगिरी करणे असणार आहे. जेव्हा जेव्हा मी राष्ट्रीय कर्तव्यावर नसेन तेव्हा मी गोव्यासाठी खेळेन आणि स्पर्धेत त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.”
एनओसी मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्याने पुन्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संपर्क केला. मे महिन्यात त्याने एमसीएला एक ईमेल लिहून एनओसी मागे घेण्याचे आवाहन केले होते, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की गोव्याला जाण्याचा कुटुंबाचा प्लॅन सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
हेही वाचा : स्मृती मानधनाचा डोळा नंबर-1 च्या सिंहासनवर! फलंदाजाची करिअरची सर्वोत्तम रेटिंग कोणती?
क्रिकेट खेळण्याचे स्वप्न उराशी घेऊन ११ वर्षांच्या वयात उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील सुरियावान येथून जयस्वाल मुंबईत आला. त्याच्या आवडीच्या आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये स्थान बनवले आहे. १९ वर्षांखालील स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासोबतच, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावून स्थानिक क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवून दिली.