आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी महिला टी-२० खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी क्रमवारीत प्रत्येकी एक स्थान मिळवले आहे. मानधना यांनी नंबर-१ चे सिंहासन मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ती आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिच्या खात्यात सध्या ७७१ रेटिंग गुण आहेत. हे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे.
भाराताची स्टार फलंदाज कोणत्या स्थानावर. फोटो सौजन्य – X (BCCI)

सध्या, नंबर वन टी-२० फलंदाज ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी आहे. तिचे ७९४ गुण आहेत. मंधना आणि मूनमध्ये २३ गुणांचा फरक आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत मानधना मुनीला मागे टाकू शकते. फोटो सौजन्य – X (BCCI)

मानधनाने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावले, ज्याच्या मदतीने भारताने ९७ धावांनी विजय मिळवला. तिने ६२ चेंडूत १५ चौकार आणि तीन षटकारांसह ११२ धावा केल्या. फोटो सौजन्य – X (BCCI)

मानधनाचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय टी-२० शतक होते. मानधना तिन्ही स्वरूपात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. टॉप १० मध्ये ती एकमेव भारतीय फलंदाज आहे. फोटो सौजन्य – X (BCCI)

शेफाली १३ व्या क्रमांकावर आली आहे. तिने पहिल्या सामन्यात २२ चेंडूत २० धावा केल्या. हरलीन देओलने ४३ धावांच्या धमाकेदार खेळीनंतर फलंदाजी क्रमवारीत ८६ व्या स्थानावर परतली आहे. फोटो सौजन्य – X (BCCI)

गोलंदाजांच्या यादीमध्ये भारताची दीप्ती शर्मा (७३५) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिने नॉटिंगहॅममध्ये दोन विकेट्स घेतल्या. टॉप १० गोलंदाजांच्या यादीत दोन भारतीय आहेत. रेणुका सिंग ठाकूर ७२१ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. फोटो सौजन्य – X (BCCI)






