Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yuzvendra Chahal : टी-20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक विक्रम; 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय

Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. तमिळनाडूविरुद्ध 3 विकेट्स घेत त्याने हरियाणाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 19, 2026 | 02:50 PM
Yuzvendra Chahal : टी-20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक विक्रम; 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय

Yuzvendra Chahal : टी-20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक विक्रम; 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय

Follow Us
Follow Us:
  • तामिळनाडूविरुद्ध चहलची सर्वोत्तम गोलंदाजी
  • निशांत संधूलाही तीन विकेट्स
  • अमित सात्विकच्या 38 धावा
 

Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटमधील अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट 2026 स्पर्धेत तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात 400 विकेट्स घेण्याची किमया चहलने केली आहे.

भारतीय क्रिकेटमधील अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याने टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट 2026 स्पर्धेत तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात चहलने ही ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हरियाणाने तमिळनाडूचा 7 विकेट्सने पराभव केला.

तामिळनाडूविरुद्ध चहलची सर्वोत्तम गोलंदाजी

इंदूर येथील डेली कॉलेज मैदानावर झालेल्या ग्रुप-बी सामन्यात चहलने 4 षटकांत अवघ्या 16 धावा देत 3 फलंदाजांना माघारी धाडले. या कामगिरीसह त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 402 विकेट्स जमा झाल्या आहेत. त्याने 346 टी-20 सामन्यांत ही कामगिरी केली आहे.

भारतीय गोलंदाजांच्या टी-20 विकेट्सच्या यादीत चहल अव्वल स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमार 366 विकेट्ससह दुसऱ्या, तर जसप्रीत बुमराह 354 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीयूष चावला (329) आणि रविचंद्रन अश्विन (323) हे पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये आहेत.

MS Dhoni Retirement: ‘…तो क्षण अजूनही आठवतो’ धोनीच्या निवृत्तीवर क्रिकेटच्या ‘देवा’ची भावूक पोस्ट

निशांत संधूलाही तीन विकेट्स

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तमिळनाडूचा संघ 19.5 षटकांत 124 धावांवर सर्वबाद झाला. बालासुब्रमण्यम सचिनने 27, अमित सात्विकने 38, तर कर्णधार साई किशोरने 19 धावांचे योगदान दिले. शाहरुख खानने 22 धावा केल्या. हरियाणाकडून चहल आणि निशांत संधू यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरियाणाने 16.1 षटकांत तीन विकेट्स गमावत विजय मिळवला. कर्णधार अंकित कुमारने 43 धावांची खेळी केली, तर निशांत संधूने नाबाद 37 धावा केल्या. यशवर्धन दलालने 21 धावांचे योगदान दिले.

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

या विजयासह हरियाणाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र, या सामन्याचे सर्वाधिक आकर्षण ठरला तो युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक 400 विकेट्सचा टप्पा. ज्यामुळे या सामन्याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय कोण ठरला?

    Ans: युजवेंद्र चहल हा टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

  • Que: तमिळनाडूविरुद्ध चहलची गोलंदाजी कशी होती?

    Ans: चहलने 4 षटकांत 16 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.

  • Que: सर्वाधिक टी-20 विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे?

    Ans: भुवनेश्वर कुमार 366 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: Yuzvendra chahal 400 t20 wickets first indian rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • T-20
  • Tamilnadu
  • Yuzvendra Chahal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.