तेंडुलकरची धोनीसाठी पोस्ट (फोटो- ट्विटर)
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंह धोनी याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धोनीच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर जगभरातील क्रिकेटपटू, चाहते आणि विश्लेषकांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने देखील धोनीसाठी पोस्ट केली आहे.
MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त
बांग्लादेशमध्ये धोनीला फलंदाजी करताना पाहण्याचा क्षण मला अजूनही आठवतो. त्याच्या पॉवर हिटिंगमध्ये काहीतरी खास आहे असे मी त्यावेळेस सौरव गांगुलीला सांगितले होते. तिथून आतापर्यंत धोनीने केलेला प्रवास हा अत्यंत अद्भुत आहे. तुझ्यासाह ड्रेसिंग रूम शेअर करणे आणि भारतीय क्रिकेटमधील काही सर्वात अविस्मरणीय क्षणांचा भाग असणे हा खरोखरच खूप जास्त आनंदाचा भाग आहे. तू काहीतरी खास करशीलच असा मला विश्वास होताच. मात्र तू त्यापेक्षा मोठे यश मिळवलेस. तू भारतीय क्रिकेटला तुझे सर्वोत्तम दिले आहेस. हा प्रवास तुझ्यासोबत अनुभवता आला, याचा मनापासून आनंद आहे. वेल प्लेड, एमएस!
महेंद्रसिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार समजला जातो. कर्णधार म्हणून त्याने अनेक महत्वाचे सामने भारताला जिंकवून दिले आहेत. विकेट्सच्या मागून आखलेली रणनीती कायमच यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. टी 20 वर्ल्डकप मध्ये बांग्लादेशविरुद्धचा कमी रन्सचा सामना देखील धोनीच्या अचूक रणनीतीमुळे भारताने जिंकला होता. तसेच 2011 मध्ये तब्बल अनेक वर्षांनी भारतीय संघाने आयसीसी वर्ल्डकप जिंकला होता. 1983 नंतर 2011 मध्ये 28 वर्षांनी भारताने वर्ल्ड कप जिंकला होता.
MS Dhoni: CSK चा नवा डाव! धोनी मेंटॉर, तर झहीर खान सांभाळणार कोचची जबाबदारी?
एकूण सामने – 278 सामने
एकूण रन्स – 5,439 रन्स
अर्धशतके – 24
सर्वाधिक रन्स – 84
आयपीएल विजेतेपद – सीएसकेला 5 वेळेस विजेतेपद
Ans: आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघासाठी मेंटॉर म्हणून काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Ans: सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात भारतीय क्रिकेटमधील वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंसोबतच परस्पर आदराचे आणि मैत्रीपूर्ण नाते आहे.






