PBKS vs KKR: Yuzvendra Chahal performed a special performance, becoming the first bowler in IPL history to do so.
PBKS vs KKR : आयपीएल २०२५ चा १८ हंगामाने आता चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ३१ सामने खेळवण्यात आले आहेत. काल मंगळवार रोजी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा ऐतिहासिक पराभव केला आहे. पंजाब किंग्जने हा रोमांचक सामना १६ धावांनी आपल्या खिशात टाकला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद केवळ १११ धावा केल्या. ११२ धावांचे लक्ष्य केकेआर सहज पूर्ण करेल असे वाटत असताना मात्र पंजाबच्या गोलंदजांनी पळतवार करुन सामाना फिरवायला. या विजयात पंजाबचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने महत्वाची भूमिका बजावली. तसेच त्याने एक विशेष कामगिरी देखील केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज बनला आहे. त्याचबरोबर, तो संयुक्तपणे सर्वाधिक ४ बळी घेणारा पहिला गोलंदाजही बनला आहे.
हेही वाचा : IND VS BAN : भारत जाणार बांगलादेश दौऱ्यावर, एकदिवसीयसोबतच रंगणार टी-२० सामने..
याबबत अधिक माहिती अशी की, पंजाब किंग्जने दिलेल्या ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कोलकाताचा संघ ९५ धावांवरच कोसळाला. या कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये युजवेंद्र चहलने २८ धावा देऊन सर्वाधिक ४ गडी बाद केले. यासह, युजवेंद्र चहलने आयपीएलच्या इतिहासात 8 वेळा चार विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. या बाबतीत त्याने कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकी गोलंदाज सुनील नारायणशी बरोबरी साधली आहे. सुनील नरेनने देखील त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ८ वेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आही.
यासह युजवेंद्र चहलने आणखी एक विशेष कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सर्वाधिक वेळा ४ विकेट्स घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावार आहे. चहलने कोलकाताविरुद्ध तीन वेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : IPL २०२५: काय सांगताय? Rishabh Pant चा एक रन लखनौला पडला २६ लाख रुपयांत, वाचा आकडेवारी..
तसेच युजवेंद्र चहल संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज बनला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध युजवेंद्र चहलने आता ३३ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत सुनील नरेन पहिल्या स्थानावर आहे.