Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

Yuzvendra chahal retire from First Class Cricket: भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने अचानक निृवत्तीची घोषणा केली आहे. चहलने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 02, 2026 | 04:10 PM
Yuzvendra chahal retire from First Class Cricket

Yuzvendra chahal retire from First Class Cricket

Follow Us
Follow Us:
  • युझवेंद्र चहलने घेतला निवृत्तीचा निर्णय
  • सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
  • First-Class क्रिकेटला निरोप
भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal Retirement )क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. चहलने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. चहल सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. त्याने आपल्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. परंतु, चहलने फक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली . तो एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळणे सुरू ठेवणार आहे. चहल गेल्या काही काळापासून भारतीय संघापासून दूर आहे आणि त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता कमीच वाटते.

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

युझवेंद्र चहलीची क्रिकेटमधून निवृत्ती

युझवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. चहलने लिहिले की, ‘ मी हातात घेतलेला पहिला क्रिकेटचा चेंडू लाल रंगाचा होता. मी १० वर्षांचा होतो आणि तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी या खेळाच्या इतका प्रेमात पडेन. लाल चेंडूचे क्रिकेट माझ्यासाठी कधीच केवळ एक प्रकार नव्हते. याच प्रकारात मी संयमाचा खरा आनंद, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य आणि प्रत्येक धाव व प्रत्येक विकेटसाठी लढत, तासनतास मैदानावर टिकून राहण्याचा आनंद शिकलो.’

माझा प्रवास अजून संपलेला नाही…

चहलने पुढे लिहिले की , ‘मी माझा शेवटचा प्रथम-श्रेणी सामना लॉर्ड्सवर खेळलो. मी हे सांगताना खूप भावूक झालो आहे, कारण कसोटी संघात स्थान मिळवणे हे माझे नेहमीच एक स्वप्न होते, जे मी अनेक वर्षांपासून जपले होते. जरी ते स्वप्न पूर्ण झाले नाही, तरी मी माझ्या प्रवासाने खरोखरच समाधानी आहे आणि या फॉरमॅटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीबद्दल मी खूप आभारी आहे. लाल चेंडूने मला माझ्या आयुष्यातील काही सर्वात सुंदर आठवणी दिल्या आहेत आणि त्या आठवणी कोणीही माझ्यापासून कधीही हिरावून घेऊ शकत नाही. पण माझा प्रवास अजून संपलेला नाही.’

चहल पुढे लिहिले की, ‘अजूनही माझ्यात देशासाठी खेळण्याची इच्छा आणि भूख आहे. माझा विश्वास आहे की माझ्यात अजूनही क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. मला एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आणखी एक संधी मिळवण्यासाठी मी माझे सर्वस्व देईन. हरियाणा क्रिकेट असोसिएशन, श्री. रणबीर सिंग महिंद्रा आणि श्री. अनिरुद्ध सिंग चौधरी यांचे विशेष आभार, ज्यांनी माझ्या संपूर्ण प्रवासात मला सातत्याने पाठिंबा दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. पहिल्यांदा लाल चेंडू हातात घेणाऱ्या १० वर्षांच्या मुलापासून ते माझा शेवटचा प्रथम-श्रेणी सामना खेळण्यापर्यंत, हा खरोखरच एक अद्भुत प्रवास राहिला आहे.’

चहलची प्रथम श्रेणी कारकिर्द

लेग-स्पिनर चहलने आपला शेवटचा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर नॉर्थम्प्टनशायरकडून लाल चेंडूच्या क्रिकेट प्रकारात खेळला. चहलने आपल्या कारकिर्दीत ४९ प्रथम-श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने ३२.२७ च्या सरासरीने १४८ विकेट्स घेतले. त्याची सर्वोत्तम कामगिरी ६/२५ ही होती. अलीकडेच, तो नॉर्थम्प्टनशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला आणि लॉर्ड्सवर मिडलसेक्सविरुद्धच्या आपल्या शेवटच्या सामन्यात दोन विकेट्स घेतले. २०२६-२७ च्या हंगामात, या ३६ वर्षीय खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पाच सामने खेळले आणि २१ विकेट्स घेतले. त्याची सर्वोत्तम कामगिरी डरहॅमविरुद्ध होती, जिथे त्याने पहिल्या डावातील पाच विकेट्ससह एकूण नऊ विकेट्स घेतले.

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

Web Title: Yuzvendra chahal retirement first class cricket announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • cricket news
  • Retirement
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते
1

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा
3

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय
4

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.