
Rajat Patidar Smash 13 sixes Century in Smat
प्रथम फलंदाजी करताना संघाचा कर्णधार रजत पाटीदारने १३ जबरदस्त षटकार ठोकत शानदार शतक झळकावले. या शतकासह त्याने आणखी एक विक्रम केला. त्याच्या खेळीमुळे मध्य प्रदेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये २५० धावांची धावसंख्या उभारली.
Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारची भारत ‘अ’ संघात निवड झाली होती, पण त्याने एकदिवसीय सामन्यांसाठी स्वतःला तंदुरुस्त नसल्याचे जाहीर केले. यानंतर, तो आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ मध्ये मध्य प्रदेश संघाकडून खेळत आहे. मध्य प्रदेश आणि आसाम यांच्यातील सामन्यात पाटीदारने फलंदाजी करताना अवघ्या ४८ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि १३ षटकारांसह नाबाद १३५ धावा ठोकल्या. पाटीदारने एकहाती सामन्याचे संपूर्ण सामन्याचे चित्र पालटले.
जेव्हा पाटीदार फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा मध्य प्रदेशने ७.४ षटकांत ३ विकेट्स गमावून केवळ ५७ धावा केल्या होत्या. पण पाटीदारच्या आगमनाने सामन्याची दिशाच बदलून गेली. आसामचा एकही गोलंदाज पाटीदारला अडचणीत आणू शकला नाही. पाटीदारच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्याच्या संघाला एक मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. पाटीदारने २८१.२५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि मध्य प्रदेशला २५० धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली.
🚨 HISTORY BY RAJAT PATIDAR – He becomes the first Madhya Pradesh batter to score Hundred in SMAT. He came to bat at Number 5 🫡🔥 pic.twitter.com/5UDnOOCYhV — Johns. (@CricCrazyJohns) November 16, 2026
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशच्या कोणत्याही फलंदाजाने शतक झळकावले नव्हते. २०२१ मध्ये, रजत पाटीदारने ९६ धावा केल्या होत्या आणि त्याचे शतक केवळ चार धावांनी हुकले होते. आता, रजत पाटीदार या स्पर्धेत शतक झळकावणारा मध्य प्रदेशचा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे.
रजत पाटीदार गेल्या दोन वर्षांपासून टी-२० फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली होती. कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग दोन आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत.