Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीकचं वयाच्या ४९ व्या वर्षी निधन, कर्करोगाशी सुरू असलेली झुंज संपली!

हीथ स्ट्रीक दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होती. या वर्षी मे मध्ये, झिम्बाब्वेच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की हीथवर दक्षिण आफ्रिकेत उपचार केले जात आहेत आणि तिची प्रकृती गंभीर आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 23, 2023 | 09:06 AM
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीकचं वयाच्या ४९ व्या वर्षी निधन, कर्करोगाशी सुरू असलेली झुंज संपली!
Follow Us
Follow Us:

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू हीथ स्ट्रीक (Heath Streak) यांच बुधवारी वयाच्या ४९ व्या वर्षी निधन (Zimbabwe Former Cricketer Dies) झालं. काही काळापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झालं होतं. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत होते. तेव्हापासून हीथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक होती. या वर्षी मे महिन्यात, झिम्बाब्वेच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते, की हीथ दक्षिण आफ्रिकेत उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर नाही.

[read_also content=”संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे! चंद्राच्या दिशेनं चांद्रयान, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास कसा होता? https://www.navarashtra.com/india/chandrayaan-3-will-reach-at-23-august-need-to-know-all-over-journey-of-chandrayaan-3-nrps-448097.html”]

हीथ स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

हीथने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याचा पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. यानंतर डिसेंबर 1993 मध्ये हीथने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने शेवटची वनडे ऑगस्ट २००५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि शेवटची कसोटी सप्टेंबर २००५ मध्ये भारताविरुद्ध खेळली. हीथने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला तीनदा आणि सौरव गांगुलीला चार वेळा बाद केले. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात, हीथने भारताविरुद्धच्या हरारे कसोटीच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली.

त्याने निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. हीथने त्या सामन्याच्या पहिल्या डावात 32 षटकात 73 धावा देत सहा विकेट घेतल्या. मात्र, त्याच्या चमकदार कामगिरीनंतरही टीम इंडियाने तो सामना 10 गडी राखून जिंकला. हिथ स्ट्रीकने 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत 1990 आणि एकदिवसीय सामन्यात 2943 धावा आहेत. टेस्टमध्ये हीथने एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावली, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 13 अर्धशतकं झळकावली. याशिवाय हीथने कसोटीत 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत 73 धावांत सहा आणि एकदिवसीय सामन्यात 32 धावांत पाच विकेट अशी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षकही होता.

Web Title: Zimbabwe cricket team former captain heath streak died at age 49 suffered cancer nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2023 | 09:06 AM

Topics:  

  • cricket
  • Heath Streak

संबंधित बातम्या

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
1

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
2

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.