
Chris Lynn : कोकेन सेवनप्रकरणी बंदी संपली; ख्रिस लिन BBLमध्ये खेळण्यास सज्ज !
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ख्रिस लिन (Chris Lynn) याचे कोकेन सेवनप्रकरणी करण्यात आलेले महिनाभराचे निलंबन पूर्ण झाले आहे. इंग्लंड क्रिकेट नियामकाने शुक्रवारी याला दुजोरा दिला. त्यामुळे आगामी बिग बॅश लीग (BBL) स्पर्धेत खेळण्यासाठी लिनचा मार्ग मोकळा झाला आहे.
BBLच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये लिनचा समावेश आहे. 18 जुलै रोजी इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20 ब्लास्ट स्पर्धेच्या अंतिम दिवशी त्याची नियमित उत्तेजकद्रव्य चाचणी करण्यात आली होती. त्या वेळी तो नॉर्थम्पटनशायर स्टीलबॅक्स संघाकडून खेळत होता. या चाचणीत त्याचा नमुना पॉझिटिव्ह आढळला होता.
क्रिकेट नियामकाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तेव्हा म्हटले होते की, नॉर्थम्पटनशायर स्टीलबॅक्सचा माजी क्रिकेटपटू ख्रिस लिन याच्यावर एक महिन्याची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या निलंबनाचा कालावधी आता पूर्ण झाला आहे.
36 वर्षीय लिनच्या नमुन्यात कोकेनच्या चयापचयातून तयार होणाऱ्या बेंझॉयलेगोनिन या घटकाचे अल्प प्रमाण आढळले होते. त्याने हा आरोप मान्य केला. ही घटना स्पर्धेबाहेरील काळातील असल्याचे आणि त्याचा मैदानावरील कामगिरीशी संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे नियमानुसार 3 महिन्यांऐवजी त्याच्यावर 1 महिन्याची बंदी घालण्यात आली.
Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…
दरम्यान, लिनने व्यसनमुक्तीसाठी आवश्यक पुनर्वसन कार्यक्रमही पूर्ण केला आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या लिनने ऑस्ट्रेलियाकडून 18 टी-20 आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो BBLमधील सर्वाधिक यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो.
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या बीबीएलच्या नव्या हंगामासाठी लिन मेलबर्न रेनेगेड्स संघात सहभागी होण्यास सज्ज आहे. निलंबन पूर्ण झाल्याने त्याच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Ans: कोकेनच्या चयापचयातून तयार होणारा घटक बेंझॉयलेगोनिन त्याच्या उत्तेजकद्रव्य चाचणीत आढळल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
Ans: त्याला एक महिन्याच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा कालावधी आता पूर्ण झाला आहे.
Ans: त्याने ऑस्ट्रेलियाकडून 18 टी-20 आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत.