मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. या अर्थसंकल्पात महिला, तरुण आणि शेतकऱ्यांवर अधिक फोकस करण्यात आल्याचा दावा निर्मला सीतारामण यांनी केला असला तरी केंद्राच्या या अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. हा अर्थसंकल्प कमी आणि जाहीरनामा जास्त वाटत आहे अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
[read_also content=”अरे देवा ! ‘या’ देशात आहे अजब प्रथा, सुंदर दिसण्यासाठी चक्क पितात कोब्रा सापाचं रक्त https://www.navarashtra.com/world/people-from-indonesia-drink-blood-of-cobra-to-look-beautiful-nrsr-231000.html”]
निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. केंद्रसरकारने चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले तब्बल ४८ हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या बजेटमध्ये जीएसटीचा मोठा महाराष्ट्राचा आहे. ही राज्यासाठी महत्वाची बाब आहे. असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
[read_also content=”बेरोजगारी रोखण्यास केंद्र सरकार अपयशी… https://www.navarashtra.com/nashik/khandesh/nashik/sameer-bhujbal-reaction-on-budget-nrps-230986.html”]