Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळमध्ये निवडणूक अर्ज भरण्यासाठी आणले चिल्लर, चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक

काही दिवसांआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. तारखा जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2024 | 02:31 PM
यवतमाळमध्ये निवडणूक अर्ज भरण्यासाठी आणले चिल्लर, चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक
Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. तारखा जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. निवडणुकीचे पडसाद देशभरात सगळीकडे उमटू लागले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. राज्यात ५ टप्य्यांमध्ये मतदान केले जाणार आहे. देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदान १९ एप्रिलला होणार आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ भागांमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली वेळ आता संपत आली आहे. तर राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे २६ एप्रिलला होणार आहे. २६ एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे निवडणूक लढणाऱ्या मनोज गेडाम यांनी निवडणूक अर्ज भरण्यासाठी १२,५०० रुपयांचे सुट्टे पैसे आणले. त्यांनी हे पैसे नामनिर्देशन पत्राबरोबर निवडणूक आयोगाकडे जमा केले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज गेडाम हे यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे १२,५०० रुपयांची नाणी जमा केली आहेत. मात्र त्यांनी जमा केलेले हे पैसे मोजण्यासाठी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे त्यांनी रक्कम स्वतः मोजून निवडणूक आयोगाकडे जमा केली, असे सांगण्यात आले आहे. गेडाम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कर्मचाऱ्यांनी हि सर्व नाणी मोजून त्यांनी वेगवेगळ्या लहान पिशव्यांमध्ये बांधून निवडणूक आयोगाकडे जमा केली.

सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना स्थानि लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात. “मी गोरगरीब जनतेची अनेक वर्षे सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे,तसेच जनतेनी दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यासाठी घेऊन आलो आहे” असं मनोज गेडाम म्हणाले.

Web Title: Chillers brought to fill election applications in yavatmal employees tired while counting chiller money yavatmal loksabha election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2024 | 02:31 PM

Topics:  

  • Election
  • Loksabha 2024

संबंधित बातम्या

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
1

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

BMC Election: महापालिका निवडणुकीत VVPAT वापरला जाणार नाही, आयोगाने सांगितले कारण, विरोधक मात्र संतप्त
2

BMC Election: महापालिका निवडणुकीत VVPAT वापरला जाणार नाही, आयोगाने सांगितले कारण, विरोधक मात्र संतप्त

मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख लोक कोण आहेत? तीन दिवसांत सर्वांची माहिती सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3

मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख लोक कोण आहेत? तीन दिवसांत सर्वांची माहिती सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक
4

Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.