Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरिपाच्या तोंडावर बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 02, 2022 | 03:18 PM
खरिपाच्या तोंडावर बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ऐन खरीपाच्या तोंडावर बाजारात ‘महाबीज’ बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा झाला आहे. ‘महाबीज’चे यावर्षी फक्त ४२ हजार क्विंटल बियाणे बाजारात आहे. ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे महागल्यानंतर आता शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्यांसाठी फरफट होत आहे. दरवर्षी राज्यभरात असते जवळपास १० लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्याची मागणी असते. असे असताना फार कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यमंत्री बच्चू कडूंनी ‘महाबीज’ने मागच्या वर्षी सोयाबीन बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता. आजही त्यांनी यावर भाष्य केले आहे.

बियाणे दरवाढीवर अंकुश लावण्यात प्रत्येकच सरकार अपयशी झाली आहे. भाजपचे असो, शिवसेनेचे असो की आमचे सरकार असो. यात बियाणे कंपन्यांची एकप्रकारे मक्तेदारी झाली आहे. यातला झारीतला शुक्राचार्य कोण? याचा शोध घेतला पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केल्याने एकप्रकारे सरकारला घरचा आहेर दिला आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. अशातच महाबीजने जे सोयाबीनचे भाव वाढवले आहेत त्याची काही गरज नाही, कंपनीपेक्षा शेतकरी पारंपारिक पद्धतीने चांगले बियाणे तयार करतो.

महाबीजने कित्येकदा बाजारातून सोयाबीन खरेदी केले आणि पॅकेटमध्ये भरून विकले याची उदाहरणे आहेत. याच फसवेगिरीला आळा बसावा यासाठी उपाय म्हणून मी बियाणे महोत्सव अमरावती आणि अकोला जिल्ह्यात सुरू केला आहे. मार्केटमध्ये जे बियाणे १५० ते २०० रुपये किलो मिळते ते शेतकऱ्यांनी अर्ध्या किमतीत खरेदी केले. अकोला येथील महोत्सवात ९०० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

अकोला जिल्हा हा लहान जिल्हा आहे. तरी आशा महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे किमान २० कोटी रुपये वाचू शकतात. कुठलीच कंपनी बियाणे निर्मितीचे निकष तंतोतंत पालन करत नाही, कंपन्यांवर बॅन घातला पाहिजे आणि फक्त शेतकरी बियाणे विकेल अशी व्यवस्था तयार झाली पाहिजे असे ही बच्चू कडू म्हणाले.

तुटवड्याची कारणे
१. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे ‘सीड प्लॉट’ वाया गेले. त्याचा फटका बियाणे निर्मिती.
२. बरेचसे बियाणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या तपासणीत नापास झाल्याने वाया गेले.
३. उन्हाळी सोयाबीनचा पर्याय निवडला. परंतू, मार्च-एप्रिल महिन्यातील तापमान वाढीचा फटका.

Web Title: Unprecedented shortage of seeds in the face of kharif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2022 | 03:18 PM

Topics:  

  • soyabin

संबंधित बातम्या

सोयाबीनच्या वाणाचे 5 नमुने बनावट, ऐन हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
1

सोयाबीनच्या वाणाचे 5 नमुने बनावट, ऐन हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

शाकाहारी प्रेमींसाठी खास! यंदाच्या विकेंडला घरी बनवून पहा रेस्टाॅरंट स्टाइल Soya Chili; नोट करा रेसिपी
2

शाकाहारी प्रेमींसाठी खास! यंदाच्या विकेंडला घरी बनवून पहा रेस्टाॅरंट स्टाइल Soya Chili; नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.