Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Acerpure ने भारतात लाँच केली नवीन टिव्ही सिरीज! फीचर्स आणि किंमत ऐकूण व्हाल हैराण

Acer ग्रुपने भारतात Acerpure Aspire आणि Swift TV series या नवीन फ्लॅगशिप प्रोडक्ट्स सिरीजचे अनावरण केले आहे. Swift TV series 4 मॉडेल्समध्ये लाँच करण्यात आले आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली Acerpure टिव्ही सिरीज स्वदेशीचा अभिमान बाळगणाऱ्या भारतीय उत्पादनाच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड आहे. Acerpure टीव्हीमध्ये गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2024 | 03:24 PM
फोटो सौजन्य - Acer

फोटो सौजन्य - Acer

Follow Us
Close
Follow Us:

Acer ग्रुपने भारतात Acerpure Aspire आणि Swift TV series या नवीन फ्लॅगशिप प्रोडक्ट्स सिरीजचे अनावरण केले आहे. Swift TV series 4 मॉडेल्समध्ये लाँच करण्यात आले आहे. 32, 43, 55 आणि 65 इंचांमध्ये acer ग्रुपची Swift TV series उपलब्ध असेल. ही टिव्ही सिरीज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे युजर्सना एक वेगळाच अनुभव मिळेल. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली Acerpure टिव्ही सिरीज स्वदेशीचा अभिमान बाळगणाऱ्या भारतीय उत्पादनाच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड आहे. चला तर मग पाहूया Acerpure टिव्ही सिरीजचे फीचर्स आणि किंमत.

हेदेखील वाचा- AI फिचर्ससह Noise चे ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच लाँच! काय आहे किंमत? जाणून घ्या.

पिक्चर क्वालिटी

Acerpure टीव्ही 1.07 अब्ज रंगांसह सुस्पष्ट चित्र देते, जे प्रत्येक दृश्याला स्पष्टता आणि जिवंतपणा आणतात. प्युअर डॉल्बी ऑडिओ, बेझल-लेस डिझाइन, जास्त कनेक्टिव्हिटी पर्याय आणि शक्तिशाली प्रोसेसरसह ही सिरीज लाँच करण्यात आली आहे. . यामध्ये प्रगत तंत्रज्ञानासह उत्तम प्रणाली देण्यात आली आहे. यामध्ये 3840 x 2160 च्या अल्ट्रा हाय डेफिनिशन (UHD) रिझोल्यूशन आहे. ज्यामुळे क्रिस्टल-स्पष्ट चित्र गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मदत होते.

फीचर्स

Acerpure टीव्हीमध्ये गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. युजर्स टीव्ही ॲप्स आणि भन्नाट फीचरसह मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात. 178-डिग्री व्ह्यूइंग अँगलसह, प्रेक्षक कोपऱ्यातून देखील सातत्यपूर्ण चित्र गुणवत्तेचा आनंद घेऊ शकतात. ज्यामुळे ही टीव्ही कौटुंबिक गरजांसाठी आणि सामाजिक समारंभाच्या वेळी योग्य पर्याय आहे. Swift TV series वर वेगवान ॲक्शन सीन आणि खेळ पाहण्याचा उत्तम अनुभव युजर्सना मिळणार आहे. यामध्ये व्हेरिएबल रिफ्रेश रेट वैशिष्ट्य देण्यात आलं आहे.

किंमत

Acerpure टीव्ही संपूर्ण भारतातील एसर एक्सक्लुजिव्ह स्टोअर्स आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ही सिरीज केवळ 11,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे, जी केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. 43-इंचाचे FHD मॉडेल (AP43UG51ASFTD) 23,490 रुपये, 55-इंचाचे 4K (AP55UG51ASFTD) मॉडेल 35,999 रुपये तर 65 इंचाच्या 4K (AP65UG51ASFTD) टीव्हीची किंमत 49,490 रुपये आहे.

हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर डाऊन प्रकरणी सीईओ सत्या नडेला यांचं मोठं वक्तव्य; X वर शेअर केली पोस्ट

साऊंड क्वालिटी

Acerpure टीव्ही सिरीज हाय क्वालिटी वैशिष्ट्ये अनुभवणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. प्युअर ऑडिओ हे एसरप्युअर स्विफ्ट सिरीज मधील मुख्य वैशिष्ट आहे. जे डॉल्बी ATMOS तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या ऑडिओ सिस्टीममुळे प्रेक्षकांना 3D साऊंड क्वालिटी अनुभव मिळतो.

कनेक्टिव्हिटी

Acerpure टिव्ही सिरीजमध्ये तीन HDMI 2.0 पोर्ट, USB 2.0, ब्लूटूथ V5.0 आणि ड्युअल-बँड वाय-फाय (2.4G + 5G), इंटरनेट सपोर्टसह कनेक्टिव्हिटीचे अनेक पर्याय आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना विविध उपकरणे सहजपणे कनेक्ट करता येतात आणि त्यांच्या आवडत्या कंटेटचा आनंद घेता येतो.

Web Title: Acerpure launches new tv series in india you will be surprised to hear the features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 03:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.