फोटो सौजन्य - Noise
वेगवेगळ्या टेक कंपन्या त्यांचे स्मार्टवॉच लाँच करत आहेत. प्रत्येक स्मार्टवॉचमध्ये त्या कंपनीचे विशेष फिचर्स देण्यात आले असतात. आधीच्या स्मार्टवॉचमध्ये नवीन बदल करून कंपन्या नवे स्मार्टवॉच लाँच करतात. त्यामुळे आपण स्मार्टवॉच खरेदी करताना गोंधळतो. कोणता स्मार्टवॉच चांगले फिचर्स देईल याबाबत आपल्याला नेहमी शंका असते. तुम्ही सुद्धा स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
लोकप्रिय कंपनी Noise नेअसाच एक उत्कृष्ट फिचर्स असणारा स्मार्टवॉच लाँच केला आहे. Noise ने ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच लाँच केलं आहे. हे स्मार्टवॉच AI फिचर्ससह लाँच करण्यात आले आहे. Noise ने हे स्मार्टवॉच मॅक्स व्हर्जन म्हणून सादर केले आहे. ColorFit Pulse 4 Max मध्ये पहिल्या स्मार्टवॉचपेक्षा मोठा डिस्प्ले आहे. ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच AI Create फिचर्स ने सुसज्ज आहे. चला तर मग पाहूया ColorFit Pulse 4 Max चे फिचर्स आणि किंमत.
हेदेखील वाचा- 1826 मध्ये काढण्यात आला होता जगातील पहिला फोटो! जाणून घ्या सविस्तर
ColorFit Pulse 4 Max चे फिचर्स
ColorFit Pulse 4 Max मध्ये पहिल्या स्मार्टवॉचपेक्षा मोठा डिस्प्ले आहे. AI आधारित या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट, IP68 रेटिंग, 7 दिवसांपर्यंतची बॅटरी आणि इतर अनेक स्पेसिफिकेशन्स देण्यात आली आहेत.
ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉचची किंमत
ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच 2,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ग्राहक हे 299 रुपयांमध्ये प्री-बुक करू शकतात. हे स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, ई कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. हे Calm Silver Link, Blue आणि Black Link कलर पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉचचा डिस्प्ले
या स्मार्टवॉचमध्ये 1.96-इंचाचा AMOLED स्क्वॅरिश ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे, जो ColorFit Pulse 4 वरील 1.85-इंचाच्या डिस्प्लेपेक्षा मोठा आहे. यात फंक्शनल क्राउन आणि 100 पेक्षा जास्त वॉच फेस देखील आहेत.
हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर डाऊन प्रकरणी सीईओ सत्या नडेला यांचं मोठं वक्तव्य; X वर शेअर केली पोस्ट
कनेक्टिवहिटी
स्मार्टवॉच TruSync फिचर्स आणि ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आहे, जे उत्तम ब्लूटूथ कॉलिंगला परवानगी देते. याशिवाय, हे वापरकर्त्यांना 10 पर्यंत संपर्क सेव्ह करण्याची आणि अलीकडील कॉल्समध्ये ॲक्सेस करण्याची परवानगी देते.
AI फिचर्स
ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच युजर्सना AI-आधारित वॉच फेस तयार करण्यास परवानगी देते. यामधे AI फिचर आहे. हे घड्याळ वापरकर्त्यांना एआय क्रिएटद्वारे AI-आधारित घड्याळाचे चेहरे तयार करण्यास अनुमती देते. यात एआय शोध वैशिष्ट्य देखील आहे, जे युजर्सना स्मार्टवॉचच्या डिस्प्लेला स्पर्श न करता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे काही सेकंदात शोधण्यासाठी मदत करतात. या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सचाही समावेश आहे. यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, SpO2 (ब्लड ऑक्सिजन) आणि नॉइज हेल्थ सूटच्या मदतीने बरेच काही करता येते. यात 100+ स्पोर्ट मोड आहेत.