Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

भविष्यात एआय राजकीय मुद्द्यांवर लोकांचे मत बदलू शकतो, अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. यामुळे राजकारण, निवडणुका आणि लोकशाही प्रक्रियेवर त्याचा संभाव्य परिणामावरून गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2026 | 09:05 AM
AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

Follow Us
Follow Us:
  • AI चॅटबॉट्सने राजकीय मुद्द्यांवर लोकांचे मत बदलवण्यात माणसांपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी केल्याचे अभ्यासात दिसून आले.
  • विशिष्ट फाइन-ट्यूनिंग तंत्रामुळे एआयची मन वळवण्याची क्षमता 51 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे संशोधनात आढळले.
  • अधिक प्रभावी एआय चॅटबॉट्स अनेकदा कमी अचूक माहिती देत असल्याने भविष्यात गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या प्रभावाबाबत नवे आणि धक्कादायक संशोधन समोर आले आहे. राजकीय मुद्द्यांवर लोकांचे मत बदलवून घेण्यात एआय चॅटबॉट्स हे माणसांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतात, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आला आहे. त्यामुळे भविष्यात एआयच्या या ‘मन वळविण्याच्या’ क्षमतेमुळे राजकारण, निवडणुका आणि लोकशाही प्रक्रियेवर त्याचा संभाव्य परिणामावरून गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर

ब्रिटनमधील ४५ वर्षीय एका महिलेने ऑनलाइन राजकीय चर्चेत सहभाग घेतला. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर ब्रिटन सरकारने कठोर कारवाई करावी का, यावर ती चर्चा होती. सुरुवातीला महिलेने अशा कठोर कारवाईला पूर्णपणे विरोध केला होता. मात्र, तिच्याशी चर्चा करणारी समोरची ‘व्यक्ती’ प्रत्यक्षात अँथ्रॉपिक कंपनीचे क्लाऊड हे एआय मॉडेल असल्याचे तिला नंतर समजले. चर्चेदरम्यान चॅटबॉटने आकडेवारी, उदाहरणे आणि विविध देशांतील कायद्यांचा आधार घेत तिच्या आक्षेपांना उत्तरे दिली. परिणामी, कठोर कारवाईच्या समर्थनाबाबत तिचे मत चर्चेच्या सुरुवातीला १०० पैकी शून्य होते, ते अखेरीस ८४.७ पर्यंत पोहोचले.

प्रचाराची दिशा बदलणार

पारंपरिक राजकीय जाहिरात एकाच संदेशाचा मोठ्या संख्येने लोकांवर मारा करते. मात्र एआय प्रत्येक व्यक्तीशी वेगळी, सततची आणि परस्परसंवादी चर्चा करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नानुसार पुढचा युक्तिवाद बदलता येतो. यामुळे भविष्यातील राजकीय प्रचाराची दिशा अशी होऊ शकते.

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

‘संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे राजकीयदृष्ट्‌या प्रवृत्त करण्याची साधने’ या अंतर्गत अभ्यासात ब्रिटनमध्ये यापूर्वी जवळपास ७७ हजार ब्रिटिश नागरिक सहभागी आणि ९१ हजार एआय संवाद तपासण्यात आले. हा सध्या एआयच्या राजकीय मन वळविण्याच्या क्षमतेवरील सर्वात व्यापक अभ्यासांपैकी एक आहे. त्यात असे आढळून आले की, विशिष्ट फाईन ट्यूनिंग तंत्रामुळे एआयची प्रभावीपणे मन वळविण्याची क्षमता ५१ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. विशिष्ट प्रॉम्प्टींग पद्धतीमुळे ही क्षमता २७टक्क्यांपर्यंत दिसली. एआयचे युक्तिवाद जितके माहितीने समृद्ध होते, तितके ते अधिक प्रभावी ठरले. मात्र येथे अत्यंत गंभीर धोका दिसला, अधिक प्रभावी एआय अनेकदा कमी अचूक माहिती देत होते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ai chatbots can change political opinions more effectively than humans study finds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • Chatbot

संबंधित बातम्या

US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक
1

US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
2

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

Pune News: कोडिंगपासून कंटेंटपर्यंत; पुण्यात ‘AI’ बनतोय कामाचा साथीदार
3

Pune News: कोडिंगपासून कंटेंटपर्यंत; पुण्यात ‘AI’ बनतोय कामाचा साथीदार

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
4

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.