1674 चा तो 'सुवर्णक्षण', छत्रपती शिवयारांचा राज्याभिषेक सोहळा! सोशल मीडियावर व्हायरल होतोय AI Video, पाहून अंगावर शहारे येतील
सोशल मीडियावर सध्या AI फोटो आणि व्हिडीओचा ट्रेंड सुरु आहे. लोकं त्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आणि मित्रमैत्रिणींचा AI फोटो आणि व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. एवढचं नाही तर अनेकजण जुन्या काळातील व्हिडीओ तयार करून देखील ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 300 ते 350 वर्षांपूर्वींचा काळ कसा होता, तेव्हाच्या लोकांचं राहणीमान कसं होतं, त्यांची घर कशी होती, अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या सर्व व्हिडीओसोंबतच आणखी व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा.
इंडियन मार्केटमध्ये लाँच झाला POCO चा लेटेस्ट स्मार्टफोन, हटके फीचर्स आणि किंमत तुमच्या बजेटमध्ये
ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला, तो दिवस कसा होता, या सोहळ्याला कोणकोण उपस्थित होतं, कशा प्रकारे तयारी करण्यात आली होती, अशा स्वरुपाचा हा AI व्हिडीओ आहे. sushantchavan7 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 3 मिलीयन व्ह्युज आणि 3,87,000 लाईक्स आले आहेत. शिवाय या व्हिडीओवर हजारो लोकांनी कमेंट देखील केल्या आहेत. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)
1674 मध्ये ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पार पडला, तो दिवस कसा होता, अशी या व्हिडीओची संकल्पना आहे. खरं तर हा एक AI व्हिडीओ आहे. पण जर हा व्हिडीओ मनापासून पाहिला तर अंगावर शहारे येतील आणि डोळ्यात पाणी येईल यात काही शंकाच नाही. व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, स्वराज्यातील एका रहिवाशाच्या नजरेतून AI द्वारे साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. भारताच्या इतिहासातील एक भव्य आणि ऐतिहासिक घटना, 6 जून 1674 रोजी साजरी करण्यात आली.
व्हिडीओमध्ये छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा कशा प्रकारे पार पडला याची एक संकल्पना सादर करण्यात आली आहे. ही सादर करण्यात आलेली संकल्पना खरंच कमाल आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, शिवरायांच्या राज्यभिषेक सोहळ्याला देशविदेशातील अनेक मंडळी उपस्थित आहेत. यामध्ये गावातील गरिब माणसांपासून ब्रिटीशांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. व्हिडीओमध्ये हत्ती, लाडू, रांगोळ्या, पताका, पाहुण्यासांठी तयार करण्यात आलेलं जेवण, महाराजांच आगमन, त्यांच सिंहासन या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहे.
इतकचं नाही तर ज्या रायगड किल्ल्यावर हा भव्य सोहळा पार पडला तो सजवलेला रायगड किल्ला आणि त्यावेळी झालेली गर्दी देखील व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. एकूणच काय तर आता AI ने आपल्या सर्वांना त्या सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली आहे. महाराजांचा राज्यभिषेक सोहळा आपल्याला याची देही, याची डोळा पाहता यावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. आता तुमची ही इच्छा AI ने पूर्ण केली आहे.