Elon Musk ची कमाल, न्यूरालिंक पहिल्यांदाच मानवांमध्ये बसवणार Blindsight चिप! अंध व्यक्तीदेखील पाहू शकणार सुंदर जग
अमेरिकेचे उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची न्यूरालिंक कंपनी अंध व्यक्तीसाठी लवकरच एक ‘ब्लाइंड साइट चिप’ घेऊन येणार आहे. कपंनीने याबाबत आधीच घोषणा केली होती. आता कंपनी या यावर्षी पहिली चिप इम्प्लांट करणार आहे. म्हणजेच न्यूरालिंक कंपनी 2025 च्या अखेरपर्यंत ही चिप व्यक्तीच्या मेंदूत बसवणार आहे. या चीपमुळे अंध व्यक्तीलासुद्धा स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल, असा कंपनीने दावा केला आहे.
ब्लाइडसाईट चिप एक आर्टिफिशियल व्हिज्युअल्स प्रोस्थेसिस आहे. याला थेट मेंदूच्या व्हिज्युअल्स कॉर्टेक्समध्ये बसवले जाईल. ही एक मायक्रो इलेक्ट्रोड चिप आहे. जी पॅमेराने सिग्नलला प्रोसेस करून मेंदूत व्हिज्युअल इमेज बनवते. त्यामुळे ज्या लोकांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तेसुद्धा अवतीभवतीचे जग पाहू शकतील. व्हिज्युअल्स कॉर्टेक्समध्ये इलेक्ट्रोड्द्वारे न्यूरॉन्सला स्टिम्युलेट करेल. बाहेरील कॅमेराने मिळवलेल्या डेटाला प्रोसेस करून मेंदूत व्हिज्युअल्स इमेज तयार करेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
सुरुवातीला अटारी ग्राफिक्ससारखी लो-रिझॉल्यूशन इमेज दिसेल. परंतु भविष भविष्यात सुपरह्यूमन व्हिजन आणि अल्ट्रा-क्लियर सुपरह्यूमनपर्यंत पोहोचू शकेल, असे एलन मस्क यांनी म्हटले आहे. ब्लाइंडसाइट ही एक प्रायोगिक ब्रेन-इम्प्लांट चिप आहे जी मेंदूच्या दृश्य कॉर्टेक्सला थेट उत्तेजित करेल. यामुळे एखाद्या व्यक्तीला डोळे आणि ऑप्टिक नसा नसतानाही पाहता येते. ही चिप पहिल्यांदाच जन्मतः अंध असलेल्या लोकांना दृष्टी देण्यास देखील मदत करू शकते.
मस्क यांनी घोषणा केल्याप्रमाणे न्यूरालिंक कंपनी 2025 च्या अखेरपर्यंत व्यक्तीमध्ये ब्लाइंड साइट चिप बसवण्याची योजना करत आहे. याआधी माकडावर याची चाचणी करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. आता माणसावर याची चाचणी केली जाणार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये अमेरिकेच्या खाद्य आणि औषधी प्रशासनाने याला ब्रेकथ्रो मेडिकल डिव्हाईसचा दर्जा दिला आहे. याआधी न्यूरालिंकने टेलिपॅथी नावाची ब्रेन चिप माणसांमध्ये यशस्वीपणे बसवली आहे. जर ही चिप यशस्वी झाली तर अंध व्यक्ती पहिल्यांदा जग पाहू शकतील. हे मस्कचं सर्वात मोठं यश असणार आहे.
एलन मस्कची कंपनी न्यूरालिंक 2025 मध्ये पहिल्यांदाच मानवांमध्ये अंधत्व दूर करणारी चिप बसवणार आहे. ही चिप अशा लोकांसाठी बनवली आहे ज्यांचे डोळे आणि ऑप्टिक नसा दोन्ही गमावले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये, यूएस एफडीएने त्याला एक यशस्वी उपकरण म्हणून मान्यता दिली. मस्क म्हणाले की पहिले इम्प्लांट 2025 च्या अखेरीस उपलब्ध होतील, ज्यामुळे पूर्णपणे अंध लोकांनाही हे जग पाहता येईल. या चिपमध्ये वैद्यकीय शास्त्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.
ब्लाइंडसाइट चिप अंध लोकांचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. जर ते यशस्वी झाले, तर जन्मापासून अंध असलेल्या लोकांना पहिल्यांदाच जग पाहण्याची संधी मिळेल. न्यूरालिंक अपघातग्रस्त लोकांसाठी ब्रेन-चिप इंटरफेस विकसित करत आहे, ज्यामुळे ते फक्त विचार करून डिजिटल उपकरणे चालवू शकतात. 2024 मध्ये, कंपनीने अशा रुग्णांवर प्रयोग केले जे त्यांच्या मनाने व्हिडिओ गेम खेळू शकले.