इंडियन मार्केटमध्ये लाँच झाला POCO चा लेटेस्ट स्मार्टफोन, हटके फीचर्स आणि किंमत तुमच्या बजेटमध्ये
स्मार्टफोन कंपनी Xiaomi च्या सबब्रँड असणाऱ्या POCO ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात POCO C71 या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आज 4 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 10,000 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच केला आहे. स्मार्टफोनची विक्री कधीपासून सुरु होणार आहे आणि स्मार्टफोमची किंमत व फीचर्स काय आहेत, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.
POCO C71 हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4+64 GB आणि 6+128 GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4+64 GB व्हेरिअंटची किंमत 6,499 रुपये आहे आणि 6+128 GB व्हेरिअंटची किंमत 7,499 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर होईल. शाओमीचा हा फोन पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि डेझर्ट गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
POCO C71 स्मार्टफोनचा पहिला सेल 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून लाईव्ह होणार आहे. ते फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. POCO C71 हा मागील POCO C61 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये नवीन डिझाइन आणि अनेक अपग्रेड्स आहेत. नवीन मॉडेलमध्ये उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि थोडी मोठी स्क्रीन आहे. जलद चार्जिंगसोबतच, POCO C71 मध्ये मोठी बॅटरी देखील आहे.
POCO C71 launched in India
– 4GB RAM , 64GB storage
– UniSOC T7250 processor
– 32MP Rear Camera , 8MP Front Camera
– 6.88-inch 120Hz Adaptive HD+ Display
– 5200mAh battery
– 4G/3G/2G Connectivity
– Cool Blue, Desert Gold, Power Black pic.twitter.com/M1WFv9H1sg— Mukul Sharma (@stufflistings) April 4, 2025
POCO C71 मध्ये 6.88-इंचाचा HD+ (1640×720 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, वॉटरड्रॉप नॉच, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 600 nits हाय ब्राइटनेस मोड आणि वेट हँड टच सपोर्ट आहे. त्या तुलनेत, POCO C61 मध्ये 6.71-इंचाचा 90Hz डिस्प्ले होता.
हा स्मार्टफोन Unisoc T7250 SoC प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचा AnTuTu स्कोअर 3,08,000 पेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त, यात 2TB पर्यंत वाढवता येणारा स्टोरेज सपोर्ट देखील आहे.
फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
स्मार्टफोनमध्ये 5,200mAh बॅटरी आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. बॉक्समध्ये 15W चा चार्जर देखील देण्यात आला आहे.
सॉफ्टवेअरच्या बाबतीत, POCO C71 हा Android 15 वर चालतो. यात दोन वर्षांचे Android अपग्रेड आणि चार वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स आहेत.
POCO C71 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग आहे.