Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
भारती एयरटेलने त्यांच्या युजर्ससाठी अनेक रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड अशा अनेक प्लॅन्सचा समावेश आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्ससोबतच कंपनी अनेक डेटा व्हाऊटर देखील ऑफर करते. प्रत्येक प्लॅनमध्ये युजर्सना वेगवगळ्या सुविधा दिल्या जातात. कधी अनलिमिटेड कॉलिंग तर कधी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन. भारती एयरटेल युजर्ससाठी सतत नवीन ऑफर्स घेऊन येत असतो आणि सतत नवीन प्लॅन्स लाँच करत असतो. या प्लॅन्समध्ये विविध फायदे उपलब्ध असतात.
WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
भारती एयरटेलच्या अशाच एका प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कंपनीचा असा एक प्लॅन ज्यामध्ये युजर्सना इंटरनेट डेटासह ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते. तसेच या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा देखील ऑफर केला जात आहे. भारती एयरटेलच्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 195 रुपये आहे. मात्र एयरटेलचा हा प्लॅन रेगुलर सर्विस व्हॅलिडिटी प्लॅन नाही. या प्लॅनची किंमत केवळ 195 रुपये आहे. हा एक डेटा व्हाउचर प्लॅन आहे. डेटा व्हाउचर हा एक असा प्लॅन आहे जो तुमच्या सर्व्हिस व्हॅलिडिटी प्लॅनपेक्षा जास्त काम करतो. एअरटेलमध्येही, 195 रुपयांचा प्लॅन वापरण्यासाठी, तुमच्याकडे एक सक्रिय सर्व्हिस व्हॅलिडिटी प्लॅन असणे आवश्यक आहे. या प्लॅनमध्ये अनेक फायदे ऑफर केले जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारती एयरटेलचा 195 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा एक डेटा प्लॅन आहे, ज्याची किंमत 195 रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 15GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 90 दिवसांची आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी JioHotstar Mobile चे एडिशनल OTT बेनिफिट देखील मिळते. JioHotstar च्या 90 दिवसांच्या मोबाईल सब्सक्रिप्शनची किंमत 149 रुपये आहे. म्हणजेच तुम्ही 149 रुपयांची बचत करून 15GB डेटा देखील मिळवू शकता. त्यामुळे ज्यांना JioHotstar सब्सक्रिप्शन आणि इंटरनेट डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट आहे.
हा प्लॅन 4G डेटासाठी आहे 5G साठी नाही. भारती एयरटेलचा हा डेटा प्लॅन संपूर्ण देसभरात उपलब्ध आहे. यूजर्स एअरटेलच्या वेबसाइटवर किंवा एअरटेल थँक्स नावाच्या कंपनीच्या मोबाइल अॅपवर 195 रुपयांचा प्लॅन मिळवू शकतात. याशिवाय यूजर्स PhonePe, GPay, CRED आणि दूसऱ्या थर्ड‑पार्टी प्लॅटफॉर्म्सवरून देखील रिचार्ज करू शकतात.
हे देखील लक्षात ठेवा की भारती एअरटेलकडे इतर प्रीपेड प्लॅन आहेत जे JioHotstar मोबाईलचा फ्री अॅक्सेस ऑफर करतात. जर तुम्हाला अशा प्लॅनसह रिचार्ज करायचे असेल तर तुम्ही कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार अनेक ऑप्शन्स पाहायला मिळतील. खरंतर 100 रुपयांचा व्हाउचर देखील आहे, ज्यासोबत JioHotstar मोबाईल 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. या व्हाउचरसह, वापरकर्त्यांना 5 जीबी डेटा मिळतो.