जास्तीचा 1 रुपया खर्च करा आणि मिळवा 14GB डेटा! युजर्सच्या फायद्यासाठी Airtel ने लाँच केला नवा प्लॅन, बेनिफिट्स वाचून व्हाल हैराण
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी असलेली एक कंपनी म्हणजेच एयरटेल. एयरटेलचे करोडो अॅक्टिव्ह युजर्स आहेत. एयरटेल त्यांच्या याच युजर्सच्या फायद्यासाठी सतत नवीन प्लॅन आणि ऑफर घेऊन येत असते. काही प्लॅनची किंमत खूप कमी असते तर काही प्लॅनमध्ये अनलिमिटेड फायदे दिले जातात. आता देखील कंपनीने असाच एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या नवीन प्लॅनची खास गोष्ट म्हणजे जुन्या प्लॅनपेक्षा केवळ 1 रुपया जास्त खर्च करून तुम्हाला 14GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे.
या नवीन प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे जुन्या 398 रुपयांच्या रिचार्जपेक्षा हा नवीन रिचार्ज प्लॅन फक्त 1 रुपये महाग आहे, परंतु त्या बदल्यात वापरकर्त्यांना 14 जीबी अतिरिक्त डेटा मिळत आहे. या नवीन प्लॅनची किंमत 399 रुपये आहे आणि देशभरातील सर्व युजर्ससाठी हा प्लॅन उपलब्ध करण्यात आला आहे. हा नवीन प्लॅन इतर कंपन्यांना टक्कर देऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
399 रुपयांच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे, या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग, हाय-स्पीड डेटा आणि मोफत नॅशनल रोमिंग (जम्मू-कश्मीर सोडून) ची सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2.5GB डेटा आणि 100 एसएमएस ऑफर केले जाणार आहेत. यासोबतच, या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी JioHotstar चे मोफत सब्सक्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. ज्यामुळे युजर्स ओटीटी कंटेटचा देखील आनंद घेऊ शकतात.
कंपनीच्या 399 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जात होता आणि जवळजवळ इतर सर्व सुविधा दिल्या जात होत्या. पण आता फक्त 1 रुपया जास्त खर्च करून, नवीन प्लॅनमध्ये दररोज 512 एमबी जास्त डेटा उपलब्ध होणार आहे. यामुळे एका महिन्यात एकूण 14 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो, यासाठी केवळ 1 रुपया जास्त खर्च करावा लागणार आहे.
TRAI ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, एअरटेल सतत आपले नेटवर्क वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे आणि मोठ्या संख्येने नवीन वापरकर्ते जोडत आहे. कंपनीची ग्राहकसंख्या आता 36 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. दुसरीकडे, या शर्यतीत व्होडाफोन आयडिया (Vi) आणि बीएसएनएलला नुकसान सहन करावे लागले आहे. या कंपन्यांच्या युजर्स संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
जिओच्या 28 दिवसांच्या प्लॅनची किंमत 223 रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएसएस आणि 56GB इंटरनेट डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये जियो सिनेमा का फ्री एक्सेस, जियो टीवी आणि जियो क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते.
Airtel खाजगी टेलिकॉम कंपनी आणि सरकारी?
खाजगी
Airtel च्या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे?
399 रुपये