Samsung Galaxy S25 FE बाबत समोर आली नवीन अपडेट! असा असणार डिस्प्ले... जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स
टेक कंपनी Samsung ने त्यांच्या Q2 2025 अर्निंग्स कॉलमध्ये या वर्षातील दुसऱ्या मोठ्या प्रोडक्ट्स लाँचिंगची घोषणा केली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, लवकरच कंपनीचे अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की, नवीन प्रोडक्ट्समध्ये ट्राइफोल्ड फोन, एक XR हेडसेट आणि Galaxy S25 FE यांचा समावेश असणार आहे. या प्रोडक्टसची गेल्या अनेक दिवसांपासून युजर्स वाट बघत आहेत. आता अखेर या प्रोडक्ट्सची घोषणा करण्यात आली आहे.
ट्राइफोल्ड फोन, एक XR हेडसेट आणि Galaxy S25 FE हे प्रोडक्ट्स कधी लाँच केले जाणार आहेत, याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र असं सागितलं जात आहे की, Galaxy S25 FE पूर्वीच्या मॉडेलपेक्षा आधी लाँच केलं जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे की, हे डिव्हाईस या महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केले जाऊ शकते. Samsung Galaxy S24 FE गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. तसेच या स्मार्टफोनची विक्री ऑक्टोबरमध्ये सुरु करण्यात आली होती. आगामी डिव्हाईसची युजर्स अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. या डिव्हाईसच्या लाँचिंगपूर्वीच त्याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. याशिवाय डिव्हाईसच्या किंमतीबाबत देखील काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy S25 FE मध्ये 7.4mm थिकनेस आणि 190 ग्रॅम वजनसह आर्मर एल्युमिनियम फ्रेम दिला जाऊ शकतो. या डिव्हाईसमध्ये 6.7-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 1Hz ते 120Hz चा वेरिएबल रिफ्रेश रेट, 1080p+ रेजोल्यूशन आणि गोरिल्ला ग्लास विक्टस+ प्रोटेक्शन असण्याची शक्यता आहे.
Galaxy S25 FE will be slightly slimmer than its predecessor Galaxy S24 FE, measuring 161.3 x 76.6 x 7.4mm and weighing 190 grams. – 6.7-inch Dynamic AMOLED 2X display with Full HD+ resolution and a 120Hz refresh rate.
– Gorilla Glass Victus
– IP68 rating #Samsung #S25FE pic.twitter.com/CrRELUGVjH — Sam Latest Updates (One UI 8) (@latestsamupdate) August 3, 2025
Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स
परफॉर्मंससाठी आगामी Galaxy S25 FE मध्ये Exynos 2400 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. आगामी डिव्हाईस 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह जोडले जाऊ शकते. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 3x ऑप्टिकल झूमसह 8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेन्सर असू शकतो. हे डिव्हाइस Android 16-बेस्ड One UI 8 वर चालण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, Galaxy S25 FE हा IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स, 45 वॅट वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि ड्युअल स्पीकरसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy S25 FE ची किंमत भारतात 50,000 रुपये ते 55,000 रुपयांदरम्यान असू शकते.
Samsung कोणत्या देशातील कंपनी आहे?
साऊथ कोरिया
Galaxy S25 FE मध्ये किती इंच डिस्प्ले असू शकतो?
6.7-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले