विशलिस्ट तयार करा! या दिवशी सुरु होतोय Amazon आणि Flipkart चा बंपर सेल, बँक कार्ड्सवर मिळणार धमाकेदार डिस्काउंट
लोकप्रिय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने आगामी सेलची घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेल सुरु होणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी आगामी फेस्टिवल सेलची घोषणा केली आहे. तसेच या आगामी सेलमधील ऑफर्स आणि डिस्काऊंटबद्दल देखील माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीुनसार, अॅमेझॉनचा आगामी ग्रेट इंडियन फेस्टिव सेल 23 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. तर फ्लिपकार्ट फेस्टिव सेल बिग बिलियन डेज देखील 23 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. या दोन्ही सेलमध्ये ग्राहकांना खरेदीवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच दोन्ही शॉपिंग प्लॅटफॉर्म ग्राहकांना बँक कार्ड डिस्काऊंट देखील ऑफर करणार आहेत. चला तर आगामी सेलमधील खास ऑफर्स आणि डिस्काऊंटबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 23 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. अॅमेझॉनच्या प्राइम सब्सक्राइबर्सना सेलचा अर्ली एक्सेस दिला जाणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक सामानावर दमदार डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. सेलमध्ये Samsung आणि Apple सारखे ब्रँड मोठं डिस्काऊंट ऑफर करणार आहेत. वायरलेस ईयरबड्स आणि स्पीकरसह ग्राहक या सेलदरम्यान टीवी, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि दूसरे होम एप्लायंसेज डिस्काउंटसह खरेदी करू शकतात.
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये युजर्स इंटरेस्ट फ्री EMI ऑफर आणि एक्सचेंज बोनसचे फायदे मिळवू शकतात. एसबीआय डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना अॅमेझॉन सेलमध्ये 10 टक्के त्वरित सूट देखील मिळेल. सॅमसंग, अॅपल, आयक्यूओ आणि वनप्लस या ब्रँडच्या स्मार्टफोनवर ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. एचपी, बोट आणि सोनी सारख्या ब्रँडच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. एलजी, सॅमसंग, हायर, गोदरेज आणि इतर ब्रँडच्या होम अप्लायन्सेसवर ग्राहकांमा 65 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल देखील 23 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर सेलची वेगळी मायक्रोसाईट लाईव्ह झाली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये अॅपल, सॅमसंग आणि मोटोरोला फोनवर बंपर डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांवरही डील उपलब्ध असणार आहेत, त्यामुळे ग्राहक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मनसोक्त खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक सदस्यांना फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2025 साठी सेलमध्ये अर्ली एक्सेस मिळणार आहे.
फ्लिपकार्ट फेस्टिव सेलदरम्यान अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना त्वरित 10 टक्के सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टवरील काही सिलेक्टेड कॅटगरीमध्ये, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे समाविष्ट आहेत, त्यांना दुप्पट डिस्काउंट देखील मिळेल. या सेलमध्ये, तुम्हाला iPhone 16, Samsung Galaxy S24 आणि Motorola Edge 60 Pro वर सर्वोत्तम डील मिळतील. यासोबतच, OnePlus Buds 3 TWS, इंटेल पॉवर्ड कंप्यूटर, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीनवरही सूट दिली जाणार आहे.