Amazon Upcoming Sale: शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होणार Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल, ब्लॉकबस्टर डील्ससह करा खरेदी
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने भारतात एका नव्या सेलची घोषणा केली आहे. कंपनीचा आगामी Amazon Great Freedom Festival 2025 येत्या काही दिवसांतच सुरु होणार आहे. कंपनीने या सेलची तारीख जाहीर केली असून या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Amazon Great Freedom Festival 2025 सेल पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सुरु होणार आहे.
Tech Tips: तुम्ही खरेदी केलेला सेकंड हॅण्ड Smartphone चोरीचा तर नाही ना? एक SMS आणि समोर येईल सत्य
नेहमीप्रमाणे Amazon Great Freedom Festival 2025 मध्ये Amazon Prime मेंबर्सना 12 तास आधी प्रवेश दिला जाणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, एक्सेसरीज, लॅपटॉप्स, होम अप्लायंसेज, Amazon डिवाइसेज आणि अनेक प्रोडक्ट्स डील्स आणि ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. Amazon ने SBI Card सह पार्टनरशिप केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना खरेदीवर इंस्टंट डिस्काउंट्स मिळणार आहे. यासोबतच एक्सचेंज आणि EMI ऑफर्स देखील उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Amazon चा Great Freedom Festival 2025 सेल भारतात येत्या 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट्स मिळणार आहे. Amazon Prime मेंबर्सना 12 तास आधी सेलचा अॅक्सेस मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना काही एक्सक्लुझिव्ह डिल्सचा फायदा घेता येणार आहे. जर तुम्हाला देखील एक्सक्लुझिव्ह डिल्सचा फायदा घेण्याची इच्छा असेल तर तुम्हीही Prime मेंबरशिप खरेदी करू शकता. Prime मेंबरशिपची मंथली किंमत 299 रुपये, क्वाटरली किंमत 599 रुपये आणि एनुअल किंमत 1,499 रुपये आहे. तसेच Amazon Prime Shopping Edition ची किंमत वर्षभरासाठी 399 रुपये आहे.
हा सेल 1 ऑगस्ट रोजी सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी देखील सेल कधी संपणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. Amazon Great Freedom Festival 2025 साठी कंपीने SBI Card सह पार्टनरशिप केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना SBI क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांजेक्शनवर 10% पर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय, ग्राहकांना एक्सचेंज ऑफर्स आणि नो-कॉस्ट EMI प्लॅन्सची देखील सुविधा मिळणार आहे, ज्यामुळे खरेदीवर आणखी बचत करण्याची देखील संधी मिळणार आहे.
स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टॅबलेट्ससारखे इलेक्ट्रॉनिक्स आणि रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनसारखे मोठे होम अप्लायंसेज Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलदरम्यान कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. या सेलमध्ये अनेक लिमिटेड-टाइम ऑफर्स उपलब्ध असणार आहेत, जसं की ट्रेंडिंग डील्स, 8pm डील्स आणि ब्लॉकबस्टर डील्स. या ऑफर्सचा फायदा घेऊन ग्राहकांना बचत करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी देखील सेलमध्ये Amazon Pay-बेस्ड ऑफर्स आणि कूपन डिस्काउंट्सचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे युजर्सना आणखी बचत करण्याची संधी मिळणार आहे.