Amazon Great Freedom Festival Sale: स्मार्ट टिव्हीवर मिळणार तब्बल 58% पर्यंत डिस्काऊंट, ही आहे खरेदीची सुवर्णसंधी!
Amazon चा बहुप्रितिक्षित Great Freedom Festival Sale 2025 सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला अनेक गॅझेट्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. जर तुम्हाला नवीन टिव्ही खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता ऑफर्स आणि डिस्काऊंटसह नवीन टिव्हीची खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची बचत देखील होणार आहे. छोट्या आकाराच्या टिव्हीपासून मोठ्या आकाराच्या टिव्हीपर्यंत तुम्ही तुमच्या पसंतीनुसार टिव्हीची खरेदी करू शकणार आहात. तुम्हाला जर प्रिमियम स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याची इच्छा असेल पण तुमचं बजेट कमी असेल तर आता Amazon Great Freedom Festival सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या स्मार्ट टिव्हीवर किती डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
ज्या लोकांच बजेट कमी आहे आणि त्यांना एक चांगल्या टिव्हीची गरज आहे, अशा लोकांसाठी Redmi 32 Inch Smart TV एक चांगला पर्याय आहे. हा टिव्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह 10,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या टिव्हीच्या खरेदीवर 58 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. रेडमीच्या 32 इंचाच्या या स्मार्ट टिव्हीमध्ये HD रेजॉल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 20W स्पीकर्ससह डॉल्बी ऑडियो सपोर्ट दिला जात आहे. हा टीव्ही लहान खोली किंवा स्टडी रूमसाठी योग्य आहे आणि किमतीनुसार खूप चांगले काम करतो. (फोटो सौजन्य – X)
ज्या युजर्सना मोठी स्क्रिन पाहिजे असेल पण त्यांचं बजेट कमी असेल तर अशा लोकांसाठी 43 इंचाचे हे मॉडेल बेस्ट ठरणार आहे. हा टिव्ही ऑफरसह 22,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या टिव्हीवर 23 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. या टिव्हीमध्ये फुल एचडी डिस्प्ले, उत्तम कलर आउटपुट आणि सोपा इंटरफेस दिलेला आहे. हा टीव्ही चित्रपट पाहण्यासाठी किंवा कुटुंबासोबत गेमिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे.
जर तुम्हाला लिविंग रूमला मिनी थिएटर बनवायचा असेल तर Kodak चा हा 55 इंचाचा 4K टीवी एक प्रीमियम ऑप्शन आहे. या टिव्हीची ऑफर प्राईज 29,479 रुपये आहे. या टिव्हीवर 51 टक्के डिस्काऊंट दिलं जात आहे. 4K Ultra HD डिस्प्ले, HDR10 सपोर्ट, 40W दमदार साउंड आणि डुअल-बँड WiFi कनेक्टिविटी हे या टिव्हीचे मुख्य फीचर्स आहेत.
फक्त डिस्काउंटच नाही, तर जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त 10 टक्के त्वरित डिस्काउंट देखील मिळेल. याशिवाय, ग्राहक नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील निवडू शकतात, ज्यामुळे पेमेंट आणखी सोपे होईल.
Amazon Great Freedom Festival Sale 2025 कधी पासून सुरु झाला?
31 जुलै 2025
कोणत्या टिव्हीवर सर्वाधिक डिस्काऊंट उपलब्ध?
Kodak 55 Inch 4K TV