विशलिस्ट तयारी केली का? Amazon - Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
ॲमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिवल सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे सेल 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. मात्र फ्लिपकार्ट प्लस, ब्लॅक मेंबर्सना आणि फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड होल्डर्सना 8 ऑक्टोबर रोजी सेलचा अर्ली ॲक्सेस मिळणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे सेलमध्ये ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या निवडक कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकेच्या को-ब्रँडेड कार्डवर देखील 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर करत आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट सुपर.मनी सर्विसद्वारे पहिल्या व्यवहारावर 10 टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. मात्र यासाठी काही नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.
ॲमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिवल सेलमध्ये एसबीआयच डेबिट आणि क्रेडीट कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट मिळू शकते. तर काही ईएमआय व्यवहारांवर देखील ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त, पात्र खरेदीवर एका स्वतंत्र ऑफरअंतर्गत 35 टक्के पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो, ज्यासाठी 150 रुपयांची कमाल मर्यादा लागू असेल. ‘ॲमेझॉन पे लेटर’ वापरून केलेल्या पात्र खरेदीवर 10 टक्के कॅशबॅकचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ॲमेझॉन 5 टक्क्यापर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक मिळू शकते.
AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की, जर सेलमध्ये एखाद्या प्रोडक्टवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट असे लिहीले असेल तर याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला प्रोडक्टच्या खरेदीवर संपूर्ण 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. खरेदीची रक्कम, कार्डची पात्रता आणि ऑफरची कमाल मर्यादा यावर डिस्काऊंट निश्चित केले जाते.






