AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
‘माइंडटेक समिट 2026’च्या मुख्य वक्त्यांमध्ये हार्वर्डचे इप्सित वाहिया, कॉर्नेल टेकच्या तन्झिम चौधरी, नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटीचे ची-चुन (जेरेमी) ली आणि युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोचे डॉ. वेंकट भट यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, इप्सित वाहिया यांनी ‘सेंसरमधून मिळणाऱ्या माहितीपासून प्रत्यक्ष रुग्णसेवेपर्यंत एआय पोहोचवताना येणाऱ्या विविध अडचणी’ या विषयावर मुख्य भाषण दिले. (फोटो सौजन्य – AI Created)
आयोजित करण्यात आलेल्या या समिटचा उद्देश मानसिक आरोग्य क्षेत्रात एआयच्या वाढत्या वापराबाबत चिकित्सक, संशोधक, तंत्रज्ञान तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि स्टार्टअप्स यांना एकाच मंचावर आणणे, असा आहे. आयोजकांनी सांगितलं की, मानसिक आरोग्याशी संबंधित एआयवर भारत आणि जगभरात रिसर्च, क्लिनिकल प्रॅक्टिस आणि टेक्नोलॉजीच्या स्तरावर काम केले जात आहे. मात्र या क्षेत्रांमध्ये चांगले समन्वय असणं गरजेचे आहे. आयोजित करण्यात आलेल्या या समिटमध्ये मुख्य भाषणे, परिसंवाद, तज्ञांची व्याख्याने आणि आरोग्य-तंत्रज्ञानातील उदयोन्मुख उपाययोजनांचे प्रदर्शन यांचा समावेश आहे.
समिटच्या पहिल्या दिवशी सकाळी 8:30 ते 9:30 यादरम्यान रजिस्ट्रेशन करण्यात आले. यानंतर स्वागत समारंभ पार पडला. सकाळी सुमारे 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पहिले मुख्य सत्र सुरु झाले. या सत्रात, हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. इप्सित वाहिया यांनी “सेन्सर्सपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत: एआय चा आरोग्यसेवेत समावेश करण्यातील अनेक गुंतागुंतीचे पैलू” या विषयावर भाष्य केले.
सोप्या शब्दांत सागांयचे झाले तर सेंसरमधून मिळणाऱ्या माहितीपासून प्रत्यक्ष रुग्णसेवेपर्यंत एआय पोहोचवताना येणाऱ्या विविध अडचणी या विषयावर त्यांनी भाष्य केले. यानंतर ‘सीमा निश्चित करणं: मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका काय असावी?’ यावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली.






