फेस्टिव्हल सेलपूर्वी Amazon ने लाँच केलं AI Chatbot Rufus! ग्राहकांना कसा होणार फायदा, जाणून घ्या
Amazon Great Indian Festival सेलला सुरुवात होणार आहे. या सेलेमध्ये ग्राहकांना अनेक गोष्टींवर आकर्षक डिस्काऊंट दिलं जाणार आहे. वर्षातील सर्वात मोठी विक्री या आठवड्याच्या शुक्रवारपासून म्हणजेच 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही Amazon प्राइम सदस्य असाल, तर तुमच्यासाठी हा सेल 26 सप्टेंबरपासूनच सुरु होणार आहे. Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्हाला घरगुती वस्तूंपासून टेक गॅझेटपर्यंत अनेक वस्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे. ई-कॉमर्स कंपनी Amazon India ने त्याच्या सेलपूर्वी एक नवीन जनरेटिव्ह AI-शक्तीवर चालणारा संवादात्मक ‘शॉपिंग असिस्टंट’ Rufus सादर केला आहे. जो आता ग्राहकांना त्यांच्या शॉपिंगमध्ये मदत करणार आहे.
हेदेखील वाचा- इंस्टाग्रामवर शेअर केलेली रिल व्हायरल होत नाही? ही सोपी ट्रीक नक्की ट्राय करा
ई-कॉमर्स कंपनी Amazon India ने त्याच्या आगामी सेल Amazon Great Indian Festival Sale 2024 च्या आधी एक नवीन जनरेटिव्ह AI-शक्तीवर चालणारा संवादात्मक ‘शॉपिंग असिस्टंट’ Rufus लाँच केला आहे. रुफस Amazon ॲपमध्ये ग्राहकांसोबत संवाद साधण्यास सक्षम असेल. ज्यामुळे उत्पादनाशी संबंधित प्रश्न विचारणे, उत्पादनांची तुलना करणे सोपे होते. याबाबत कंपनीने एक निवेदन सादर केलं आहे. या निवेदनात कंपनीने शॉपिंग असिस्टंट’ Rufus बद्दल माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
ॲमेझॉन इंडियाचे कॅटेगरीजचे अध्यक्ष सौरभ श्रीवास्तव म्हणाले की, टाइपिंग असो वा बोलणे, ग्राहक आता खरेदीचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकणार आहेत. AI च्या मदतीने आता ग्राहकांना Amazon Great Indian Festival Sale 2024 मधून खरेदी करणं अधिक सोपं होणार आहे. सौरभ श्रीवास्तव यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चालित ‘रिव्ह्यू हायलाइट्स’ देखील सादर केले आहेत, जे उत्पादनांबद्दल ग्राहकांना माहिती देण्यास सक्षम आहेत.
हेदेखील वाचा- कोल्डप्लेमुळे BookMyShow कसा क्रॅश झाला? वेबसाइट डाउनचं कारणं आलं समोर
‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ 27 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. प्राइम मेंबर्ससाठी हा सेल 24 तास आधीच सुरु होणार आहे. ब्रँड्सद्वारे ऑफर केलेल्या डील व्यतिरिक्त, ॲमेझॉन इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल फोन, टीव्ही, उपकरणे, फॅशन, हेल्थकेअर आणि बरेच काही ग्राहक या सेलमधून खेरदी करू शकतात. ब्रँड्समधून सुमारे 25,000 नवीन उत्पादने ऑफर करत आहे, असे देखील श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.
27 सप्टेंबरपासूनAmazon Great Indian Festival सेल सुरु होणार आहे. सेलमध्ये तुम्हाला घरगुती वस्तूंपासून टेक गॅझेटपर्यंत अनेक वस्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे. तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्हाला iPhone, Google Pixel सिरीज, Galaxy S23 Ultra, Nothing phone, Vivo X Fold 3 Pro वर चांगली डील मिळणार आहे. त्यामुळे वाट पाहू नका आत्ताच तुमच्या खरेदीची लिस्ट तयार करा आणि सेल सुरु होताच खरेदीला सुरुवात करा.