सोशल मिडीयाच्या जगात इंस्टाग्रामस फेसबुक, हे प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. सामान्य माणसांपासून मोठ मोठ्या सेलिब्रिटीपर्यंत सर्वचजण इंस्टाग्रामवर रिल्स आणि पोस्ट अपलोड करत असतात. अशावेळी काही लोकांची रिल किंवा पोस्ट प्रचंड व्हायरल होते. पण अनेकांची रिल व्हायरल होत नाही. त्यामुळे आपण नाराज होतो. पण आता आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रीक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवर शेअर केलेली रिल नक्कीच व्हायरल होईल. ह्यासाठी तुम्हाला फार काही करण्याती गरज नाही. फक्त सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केलेली रिल व्हायरल होत नाही? ही सोपी ट्रीक नक्की ट्राय करा (फोटो सौजन्य - pinterest)
अनेक कंटेट क्रिएटर्स तक्रार करतात की त्यांच्या रिल किंवा पोस्टला जास्त व्हुज मिळत नाहीत. तुमची रिल व्हायरल करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
सर्वात आधी तुमच्या डिव्हाइसवर इंस्टाग्रामवर ओपन करा आणि प्रोफाईल पर्यायावर क्लिक करा.
यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या तिन डॉटवर क्लिक करा आणि त्यानंतर सजेस्टेड कंटेटवर क्लिक करा.
आता स्पेसिफिक शब्द आणि प्रेसिसवर क्लिक करा. आता तुम्ही तुमच्या रिल्स संबंधित टॅग, किवर्ड किंवा इमोजी रिल्ससोबत जोडू शकता.
इतर इंस्टाग्राम युजर्स जेव्हा तुम्ही मेन्शन केलेले टॅग, किवर्ड किंवा इमोजी सर्च करतील तेव्हा तुमची रिल त्यांना दिसेल.
या सोप्या टिप्स तुम्हाला तुमची रिल व्हायरल करण्यासाठी मदत करू शकतात.