
App Store Awards 2025: Apple ने Tiimo ला दिलं बेस्ट अॅप अवॉर्ड, तर गेमिंगमध्ये 'या' अॅपने मारली बाजी
अॅप स्टोअर अवॉर्ड्समध्ये कंपनी वर्षभरातील सर्वोत्कृष्ट अॅप्स आणि गेम्सना सन्मानित करते. त्याप्रमाणे 2025 च्या विजेत्यांची घोषणा आता करण्यात आली आहे. अॅपलच्या अॅप स्टोअर संपादकांनी 45 फाइनलिस्ट्समधून 17 अॅप्स/गेम्स निवडले आहेत. तांत्रिक नवकल्पना, उत्कृष्ट यूजर्स एक्सपिरिअंस आणि डिझाइन, आणि सांस्कृतिक प्रभाव या गोष्टी लक्षात ठेऊन 17 उत्तम अॅप्स/गेम्सची निवड करण्यात आली आहे. आयफोन, आयपॅड, मॅक, अॅपल वॉच, अॅपल टीव्ही आणि अॅपल व्हिजन प्रो सारख्या प्लॅटफॉर्मवर कोणत्या अॅप्सनी उत्तम कामगिरी केली, त्यांचा सन्मान केला जातो.