सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए११ भारतात लाँच, दैनंदिन वापरासाठी ठरणार बेस्ट पर्याय! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
गॅलेक्सी टॅब ए११ मध्ये ८.७ इंच डिस्प्लेसह ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला आहे, ज्यामधून वेब ब्राऊज करायचे असो, सोशल मीडिया पाहायचे असो किंवा तुमचे आवडे शोज पाहायचे असो कोणत्याही प्रकाशामध्ये अद्वितीय व्युइंग आणि सुलभ स्क्रॉलिंग अनुभव मिळतो. गॅलेक्सी टॅब ए११ मध्ये डॉल्बी-इंजीनिअर्ड ड्युअल स्पीकर्स आहेत, जे चित्रपट, संगीत किंवा व्हिडिओ कॉल्ससाठी परिपूर्ण, मोठा व बहुआयामी ऑडिओ देतात.
६एनएम-आधारित ऑक्टा-कोअर प्रोसेसरची शक्ती असलेला गॅलेक्सी टॅब ए११ जलद व ऊर्जा-कार्यक्षम आहे, जो सुलभ मल्टीटास्किंगसाठी अनुकूल आहे. तसेच या टॅबमध्ये ५१०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व मनमुराद मनोरंजनाचा आनंद घेता येतो. क्लासिक ग्रे व सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या गॅलेक्सी टॅब ए११ मध्ये जवळपास ८ जीबी मेमरी क्षमता आहे, ज्यामुळे जलदपणे व सुलभपणे मल्टीटास्क करता येतात. या टॅबमध्ये १२८ जीबी स्टोरेज देखील आहे, ज्यासह मोठ्या आकाराच्या फाइल्स सेव्ह करता येतात. तसेच, वापरकर्ते मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज क्षमता जवळपास २ टीबीपर्यंत वाढवू शकतात.
गॅलेक्सी टॅब ए११ मध्ये सुस्पष्ट व्हिडिओ कॉल्ससाठी ५ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा दिला आहे. कुटुंबासोबत गप्पागोष्टी करायच्या असोत किंवा टीमसोबत कामासंदर्भात चर्चा करायची असो अधिक सुस्पष्टतेमधून वास्तविकत: समोरासमोर चर्चा केली जात असल्याचा अनुभव मिळतो.
गॅलेक्सी टॅब ए११ Samsung.com, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. Galaxy Tab A11 च्या WiFi 4GB+ 64GB व्हेरिअंटची किंंमत 12999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक मिळणार आहे. Galaxy Tab A11 च्या LTE 4GB +64GB व्हेरिअंटची किंंमत 15999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक मिळणार आहे. Galaxy Tab A11 च्या WiFi 8GB +128GB व्हेरिअंटची किंंमत 17999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक मिळणार आहे. Galaxy Tab A11 च्या LTE 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंंमत 20999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक मिळणार आहे.
Ans: Samsung Members अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर “Service Center Locator” पर्याय वापरून सहज शोधू शकता
Ans: होय, Samsung Pay भारतात काम करतो; परंतु काही बँकांच्या सपोर्टमध्ये बदल होत राहतात.
Ans: Samsung चे स्वतःचे कस्टम Android इंटरफेस आहे, ज्यात अतिरिक्त फीचर्स, क्लीन UI आणि स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.






