WWDC 2026: 'या' दिवशी सुरु होणार Apple चा सर्वात बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट... iOS 27 पासून सिरीपर्यंत कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज
Free Fire Max: गेममध्ये स्टेप अप ईव्हेंटची एंट्री! मोफत मिळणार प्रिमियम रिवॉर्ड्स, अशी आहे प्रोसेस
हा ईव्हेंट ऑनलाईन स्ट्रिम केला जाणार आहे. मात्र काही डेवलपर्स आणि विद्यार्थ्यांना क्यूपर्टिनोमधील ॲपल पार्कमध्ये एंट्री करण्याची संधी मिळणार आहे. स्विफ्ट स्टुडंट चॅलेंजच्या विजेत्यांची घोषणा 26 मार्च रोजी केली जाणार आहे आणि 50 प्रतिष्ठित विजेत्यांना तीन दिवसांच्या विशेष अनुभवासाठी ॲपल पार्कमध्ये आमंत्रित केले जाईल. (फोटो सौजन्य – X)
रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, WWDC 2026 मध्ये ॲपल त्यांच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टिम्स आयओएस 27, आयपॅडओएस 27, मॅकओएस 27, वॉचओएस 27 आणि व्हिजनओएस 27 सादर करू शकतो. यावेळी ईव्हेंटमध्ये सिरीसाठी देखील मोठे अपग्रेड जारी केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा देखील सुरु झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, ॲपल एक नवीन चॅटबोट वर्जनवर काम करत आहे, याचे कोडनेम Campos असे आहे. हे सिरीला पूर्णपणे कंवर्सशनल बनवू शकतो. चॅटजीपीटी आणि गूगल जेमिनी सारख्या एआय चॅटबोट्ससोबत स्पर्धा करण्यासाठी सिरीचे मोठे अपग्रेड डिझाईन केले जात आहेत.
Apple has officially announced WWDC 2026, set to start on June 8! 🚨 Apple is expected to introduce iOS 27 at the event pic.twitter.com/fr5TzgcYmF — Apple Hub (@theapplehub) March 23, 2026
अलीकडेच जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट्समधून अशी माहिती मिळत आहे की, iOS 27 मध्ये फीचर्सऐवजी स्टेबिलिटी आणि परफॉर्मंसवर अधिक जास्त फोकस केला जाणार आहे. ॲपल इंजीनियर्स ओएससह अनेक भाग पुन्हा एकदा डिझाईन करत आहेत. यामुळे बग्स कमी होतील आणि जुन्या आयफोन्सना देखील अधिक चांगले बॅटरी बॅकअप मिळणार आहे.
Mark Zuckerberg ची जागा घेणार AI चॅटबॉट? धक्कादायक माहिती आली समोर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
यावेळी WWDC 2026 मध्ये नवीन हार्डवेयर लाँच केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, मॅक मिनी आणि मॅक स्टुडिओ नवीन M5 सीरीज चिप्ससह लाँच केले जाण्याची शक्यता आहे. हे नवीन चिप्स M4 च्या तुलनेत 30% पर्यंत वेगवान CPU आणि 50% पर्यंत उत्तम ग्राफिक्स परफॉर्मन्स देऊ शकतात.






