Refrigerator Not Cooling (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
फ्रीजमधील कुलिंग बंद होण्यामागे बऱ्याचदा कंडेन्सर कॉइल्सवर धूळ साचणे किंवा ऑटो-डिफ्रॉस्ट सिस्टीममध्ये बिघाड असणे ही मुख्य कारणे असतात. हे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी महागड्या दुरुस्तीची गरज नसते. योग्य माहिती आणि काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही फ्रीजचे काम पुन्हा सुरळीत करू शकता, ज्यामुळे तुमचा वेळ आणि मेकॅनिकचा खर्च दोन्ही वाचू शकतो.उन्हाळा असो वा हिवाळा, घरातील सर्वात महत्त्वाचे आणि सतत चालणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे रेफ्रिजरेटर. Refrigerator Not Cooling?
पण अनेकदा अचानक फ्रिजमधील कुलिंग बंद होतं, ज्यामुळे आतील अन्नपदार्थ खराब होण्याची भीती असते. अशा वेळी लोक लगेच मेकॅनिकला कॉल करतात. मात्र, मोठ्या कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास केल्यास असं दिसून येतं की, फ्रिज थंड न होण्यामागे अनेकदा अगदी साधी कारणं असतात, जी घरच्या घरी पण सहज ठीक करता येतात.
तुमच्या फ्रिजमध्ये कुलिंगची समस्या येत असेल, तर मेकॅनिकला पैसे देण्याआधी खालील ५ महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून तपासाव्यात.
अनेकदा फ्रिज साफ करताना किंवा घरातील लहान मुलांमुळे तापमान नियंत्रित करणारा थर्मोस्टॅट किंवा डिजिटल कंट्रोल चुकून बदलला जातो. मोठ्या रेफ्रिजरेटर कंपनी Whirlpool च्या अधिकृत ब्लॉगनुसार, फ्रिजचं आदर्श तापमान 33°F ते 40°F (सुमारे 3°C ते 5°C) असणं आवश्यक आहे. जर तुमच्या फ्रिजचं तापमान यापेक्षा जास्त सेट झालं असेल, तर कॉम्प्रेसर योग्य रीतीने काम करत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तापमान पुन्हा सेट करा आणि ते पूर्ववत होण्यासाठी 24 तास वाट बघा.
फ्रिजच्या मागील किंवा खालच्या भागात कंडेन्सर कॉइल्स असतात, ज्या फ्रिजमधील उष्णता बाहेर टाकण्याचं काम करतात. आघाडीची कंपनी Haier च्या मेंटेनन्स गाईडलाईननुसार, जर या कॉइल्सवर धूळ, माती किंवा पाळीव प्राण्यांचे केस साचले, तर फ्रिज उष्णता बाहेर टाकू शकत नाही आणि कुलिंग पूर्णपणे थांबतं. यासाठी वर्षातून किमान एकदा फ्रिजचा पॉवर प्लग काढून व्हॅक्यूम क्लिनर किंवा मऊ ब्रशच्या मदतीने या कॉइल्स साफ कराव्यात.
फ्रिजच्या आत थंड हवा फिरवण्यासाठी ठिकठिकाणी लहान छिद्रे दिलेली असतात. नामांकित ब्रँड Maytag ने दिलेल्या सल्ल्यानुसार, जेव्हा लोक फ्रिजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामान भरतात किंवा मोठ्या वस्तू थेट या एअर व्हेंट्सच्या समोर ठेवतात, तेव्हा हवेचा प्रवाह थांबतो. हवा खेळती न राहिल्यामुळे फ्रीझरमध्ये बर्फ साचतो, पण खालच्या भागात कुलिंग होत नाही. त्यामुळे व्हेंट्ससमोर नेहमी पुरेशी जागा ठेवावी.
फ्रिजच्या दरवाजाला लावलेलं रबर आतील थंड हवा बाहेर जाण्यापासून रोखतं. दुरुस्ती क्षेत्रातील नामांकित संस्था iFixit च्या अधिकृत मॅन्युअलमध्ये असं सांगितलं आहे की, जर हे गॅस्केट सैल झालं किंवा त्याला तडे गेले, तर बाहेरची गरम हवा सतत आत येते आणि कुलिंग कमी होतं. हे तपासण्यासाठी दरवाजाच्या मधे एक कागद किंवा नोट अडकवून दरवाजा बंद करावा; जर कागद सहज बाहेर ओढला गेला, तर गॅस्केट खराब झालं असून ते बदलणं गरजेचं आहे.
अनेक घरांमध्ये फ्रिज अगदी भिंतीला चिकटवून किंवा कपाटाच्या कोपऱ्यात घट्ट बसवला जातो. पण तांत्रिक मानकांनुसार, फ्रिजच्या दोन्ही बाजूंना आणि मागील बाजूस किमान 1 इंचाची मोकळी जागा असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कॉम्प्रेसरमधून निघणारी उष्णता बाहेर पडू शकेल. पुरेशी जागा नसल्यास कॉम्प्रेसर ओव्हरहीट होतो आणि आपोआप बंद पडतो.
या सगळ्या गोष्टी तपासूनही जर फ्रिज थंड होत नसेल, तर ती आतल्या गॅस लीक किंवा कॉम्प्रेसर निकामी झाल्याची गंभीर समस्या असू शकते. अशा वेळी कोणत्याही अर्धवट माणसाकडून दुरुस्ती करून न घेता, थेट अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून चांगल्या तंत्रज्ञाची मदत घेणंच सुरक्षित आणि योग्य ठरतं.
Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क
मित्रांनो, पुढच्या वेळी फ्रिजने थंड करणं बंद केलं तर घाबरून जाऊ नका. आधी या 5 गोष्टी स्वतः तपासा. कदाचित तुमचा 500-1000 रुपयांचा खर्च फक्त 5 मिनिटात वाचेल.
Ans: सर्वात आधी फ्रिजचे तापमान सेटिंग आणि थर्मोस्टॅट तपासावे.
Ans: कंडेन्सर कॉइल्स वर्षातून किमान एकदा व्हॅक्यूम क्लिनर किंवा मऊ ब्रशने साफ कराव्यात.
Ans: होय. जास्त सामान भरल्याने एअर व्हेंट्स ब्लॉक होतात आणि थंड हवेचा प्रवाह कमी होतो.






