iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत 'हे' गॅझेट्स होणार लाँच
iPhone 17 launch: टेक जायंट कंपनी अॅपल पुन्हा एकदा स्मार्टफोन मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी आणि इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवण्यासाठी तयार आहे. आयफोन युजर्सचा सर्वात आवडता ईव्हेंट पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये केवळ आयफोन 17 सिरीजच नाही तर अनेक प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत. ईव्हेंट नेमका कधी लाँच केला जाणार, तारीख आणि वेळ काय असणार, युजर्स हा लाईव्ह ईव्हेंट कसा पाहू शकतात, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र या ईव्हेंटमध्ये कोणते गॅझेट्स लाँच केले जाणार आहेत, याबाबत आता माहिती समोर आली आहे.
अॅपलच्या आगामी ईव्हेंटमधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजेच आयफोन 17 सिरीज. युजर्स गेल्या वर्षभरापासून या सिरीजची वाट पाहत होते. या सिरीजमध्ये कंपनी एकूण 4 मॉडेल्स लाँच करणार आहे. यामध्ये आयफोन 17, आयफोन 17 एयर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स यांचा समावेश असणार आहे. हे मॉडेल्स नवीन डिझाईन आणि अनेक अपग्रेडेड फीचर्ससह लाँच केला जाणार आहे. या मॉडेल्समध्ये पूर्वीपेक्षा अधिक चांगली बॅटरी दिली जाऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
आईफोनसह अॅपलना वॉच अल्ट्रा 3 ची देखील प्रतिक्षा आहे. या ईव्हेंटमध्ये हे गॅझेट देखील लाँच केले जाणार आहे. यामध्ये मोठा डिस्प्ले, 5G आणि सॅटेलाइट कनेक्टिविटी, नवीन चिप आणि फास्टर चार्जिंग सारखे फीचर्स दिले जाणार आहेत.
अॅपल त्यांची वॉच सीरीज 11 काही बदलांसह या ईव्हेंटमध्ये लाँच करू शकते. अनेक रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, या सिरीजमध्ये स्लीप स्कोर नावाचे नवीन फीचर दिले जाऊ शकते.
अमेरिकेतील टेक दिग्गज हे वॉच पहिल्यापेक्षा आणखी मोठ्या डिस्प्लेसह बाजारात लाँच करू शकते. 2022 मध्ये या मॉडेलमध्ये कोणतेही विशेष अपडेट देण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीत, असा अंदाज लावला जात आहे की कंपनी या वर्षी ते अपडेट करू शकते. त्याचे प्लास्टिक व्हर्जन देखील लाँच केले जाऊ शकते.
आईफोन आणि वॉचसह अॅपल पुढील महिन्यात नवीन टिव्ही देखील लाँच करू शकते. यामध्ये कंपनीचीची इनहाउस वाय-फाय आणि ब्लूटूथ चिप दिली जाऊ शकते. यामध्ये फेसटाइम कॅमेरा दिला जाण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
अॅपल पुढील महिन्यात अपडेटेड डिझाइनसह नवीन एयरपॉड्स लाँच करू शकते. यामध्ये नवीन चिप, नॉइस कँसिलेशन आणि अधिक चांगल ऑडियो एक्सपीरियंस मिळणार आहे.
कंपनी लवकरच 2nd Gen एयरटॅग आणू शकते अशी शक्यता आहे. तथापि, त्यांच्या लाँचिंगची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. हे एअरटॅग्ज 3 पट जास्त ट्रॅकिंग रेंज आणि टेंपर-प्रूफ स्पीकर डिझाइनसह येतील.