
Appleचा यूजर्सना मोठा दिलासा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सप्टेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा iPhone 14 Pro वर हे सॅटेलाईट फिचर आलं होतं. तेव्हा कंपनी म्हणाली होती की, एक वर्ष फ्री देऊ, नंतर पैसे लागतील. पण तीन वर्ष झाली तरी कंपनी अजून पैसे मागत नसून ही तिसरी वेळ आहे जेव्हा Apple ने फ्री सेवा वाढवली आहे. या तीन वर्षात कंपनीने हे फिचर फक्त फ्री ठेवलं नाही, तर अजून चांगलं पण केलं. आधी फक्त इमर्जन्सी SOS साठी होतं, आता बरेच ॲप्स त्यावर चालतात. मेसेज पाठवणं, लोकेशन शेअर करणं सगळं सॅटेलाईटवरून होतं. नेटवर्क नसेल तेव्हा हे खूप कामाला येतं.
गंमत म्हणजे 9 सप्टेंबरला जो ‘Surprise and Shine’ कार्यक्रम झाला, त्यात Apple ने स्टेजवर याबद्दल एक शब्द पण काढला नाही. iPhone 18 Pro आणि फोल्ड होणारा फोन दाखवण्यात ते बिझी होते. ही फ्री वाढवली आहे हे त्यांनी नंतर iPhone 18 Pro च्या पत्रकात एकदम खाली, तळटीपेत लिहिलं होतं. बऱ्याच लोकांचं लक्षच गेलं नाही.
Apple ने सांगितलंय की iPhone 14, iPhone 15 आणि iPhone 16 वापरणाऱ्यांना याचा फायदा मिळेल. पण एक अट आहे की, तुमचा फोन 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री आधी, अमेरिकेच्या टाईमप्रमाणे, ॲक्टिव्हेट झालेला असावा. आणि तो पण अशा देशात जिथे सॅटेलाईट फिचर चालतं. भारतात हे फिचर अजून पूर्णपणे सुरू झालं नाही, पण अमेरिकेत, युरोपमध्ये चालतं. जर तुम्ही 9 सप्टेंबरनंतर नवीन iPhone 16 किंवा iPhone 17 Pro घेतला असेल, तरी तुम्हाला नवीन फोनसोबत एक वर्ष फ्री मिळेलच. प्रत्येक नवीन iPhone सोबत एक वर्ष फ्री येतंच.
iPhone 17 Price Hike: Appleचा मोठा झटका! भारतात iPhone 17, iPhone Airसह सर्वच मॉडेल्स महागले
अफवा होती की iPhone 18 Pro मध्ये काहीतरी नवीन सॅटेलाईट फिचर ज्याने जास्त स्पीड किंवा व्हिडिओ कॉल होतील परंतू तसं काही झालं नाही. 18 Pro मध्ये तेच जुनं फिचर आहे. पण एक वर्ष फ्री मिळतंय म्हटल्यावर लोकांची नाराजी थोडी कमी झाली आहे.आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हे फ्री किती दिवस चालणार? Apple कायम फ्री देणार की एक दिवस अचानक पैसे मागणार?
कंपनीच्या भाषेवरून वाटतंय की ते अजून पैसे घ्यायला तयार नाहीत, पण कायम फ्रीचं आश्वासन पण देत नाहीयेत. म्हणजे भविष्यात कधीतरी हा प्लॅन पेड होऊ शकतो.पण सध्या तरी टेन्शन नाही. तुमच्याकडे 14, 15 किंवा 16 असेल तर अजून एक वर्ष तुम्ही नेटवर्क नसताना पण SOS आणि मेसेज पाठवू शकता.