Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दरवर्षी गणपती सण आला की, आपल्या जवळच्या व्यक्तींना बोलण्यासाठी आपण कार्ड छापतो. परंतू दरवर्षी एकाच पद्धतीने कार्ड छापतो. डेकोरेशनचा विचार, मोदक बनवणे आणि गर्दीत रांगेत उभे राहणे. पण यावेळी चित्र थोडं बदललंय. या वर्षी बऱ्याच मंडळांनी आणि घरातल्या लोकांनी सुद्धा AI ला कामाला लावलंय. सण आहे भक्तीचा, पण थोडी टेक्नॉलॉजी वापरली तर काम सोपं होतं आणि मजा पण जास्त येते. तुम्हाला पण यंदा काहीतरी वेगळं करायचं असेल तर या 5 आयडिया नक्की बघा. Ganeshotsav 2026:
रोज तेच “गणपती बाप्पा मोरया, आमच्या घरी या” असा मॅसेज फॉरवर्ड करून कंटाळा आला ना? यावेळी ChatGPT किंवा Gemini ला सांगा. फक्त असं लिहा – “मला माझ्या घरच्या गणपतीसाठी एक छान मराठी आमंत्रण पत्रिका लिहून दे, थोडं हसतमुख भाषेत”. तर ते एकदम भारी पत्रिका लिहून देईल.आणि फोटो? Midjourney किंवा Copilot वर जाऊन “पाटावर बसलेला बाप्पा, मागे फुलांची आरास, मुंबईचा चाळीतला लूक” असं टाकलं की तुमच्या नावाचं एकदम यूनिक कार्ड तयार होतं. त्यानंतर तुम्ही थेट WhatsApp ला पाठवा. लोक म्हणतील अरे हे कुठून बनवलं?
घरातली सजावट डोकं खाऊ नका, AI ला विचाराबऱ्याच वेळा काय होतं, जागा लहान असते, बजेट कमी असतं आणि डोक्यात आयडिया नसते. मग YouTube बघत बसतो. त्यापेक्षा AI ला सरळ सांगा – “माझ्या हॉलमध्ये 5 बाय 5 ची जागा आहे, माझं बजेट 2000 रुपये इतके आहे, त्यासाठी इको-फ्रेंडली मखर कसं बनवू?”तो तुम्हाला लगेच 2-3 डिझाईन देईल. पुठ्ठा, बांबू, वर्तमानपत्रापासून कसं बनवायचं याचा नकाशा पण देईल. फोटो दाखवेल. त्यामुळे दुकानात जाऊन भटकायची गरज नाही. घरबसल्या सगळं प्लॅन होतं.
पहिल्या दिवशी उकडीचे मोदक, दुसऱ्या दिवशी तळलेले मोदक फिक्स असतात. तिसऱ्या दिवशी काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आईसमोर उभा राहतो. त्यामुळे ती सुद्धा कंटाळते.त्यापेक्षा Ai ला सांगा की, आमच्या किचनमध्ये वा, गूळ, नारळ आणि थोडं चॉकलेट आहे, यातून बाप्पासाठी काहीतरी वेगळा नैवेद्य सांग”. तर तो लगेच सांगेल – चॉकलेट मोदक कसा करायचा, मँगो मोदक, ड्रायफ्रूट मोदक. स्टेप बाय स्टेप मराठीत रेसिपी देतो. वेळ पण वाचतो आणि बाप्पासोबत आपल्याला रोज नवीन प्रसाद मिळेल .
Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
आजकाल बऱ्याच ठिकाणी आरतीसाठी स्पीकरवर तेच जुने ट्रॅक लागतात. यावेळी तुम्ही स्वतःची आरती बनवू शकता. Suno किंवा अशा AI म्युझिक टूलवर जा आणि लिहा – “ढोल ताशांसोबत एकदम एनर्जेटिक गणपती आरती बनव”.तो काही सेकंदात एक नवीन गाणं बनवून देईल. तुम्हाला हवं तर पारंपरिक चाल ठेवा, नको असेल तर थोडं मॉडर्न बीट टाका. तुमच्या मंडळात किंवा घरात ते लावलं की सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच राहील.
AI सांभाळेल हे घरच्यांपेक्षा मोठ्या मंडळांसाठी जास्त महत्वाचं आहे. लालबाग, दगडूशेठ इथे लाखो लोक येतात. पोलीस आणि कार्यकर्त्यांना गर्दी सांभाळणं खूप अवघड जातं.आता बऱ्याच मंडळांनी AI वाले CCTV लावलेत. हे कॅमेरे नुसते रेकॉर्ड करत नाहीत. गर्दी कुठे जास्त वाढतेय, कोणी संशयास्पद वागतंय का, रांग कुठे अडकलीय हे लगेच सांगतात. त्यामुळे चेंगराचेंगरी होण्यापासून वाचता येतं. VIP आणि सामान्य लोकांच्या रांगा पण AI मुळे व्यवस्थित वेगळ्या होतात.एकूण काय तर, यंदा गणपती हा फक्त भक्तीचा नाही तर भक्ती आणि टेक्नॉलॉजीचा संगम आहे. AI मुळे आपला वेळ, पैसा आणि शक्ती तिन्ही वाचतंय आणि सण अजून जास्त सुरक्षित आणि भारी होतोय.






