iPhone 17 Price Hike: Appleचा मोठा झटका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
iPhone 17 price hike India: Apple ची नवीन सीरीज आली की, जुनं मॉडेल स्वस्त होते. असा विचार आपण नेहमीच करतो. आता मात्र चित्र वेगळं पाहायला मिळत आहे. iPhone 18 Pro आणि त्याचा पहिला फोल्ड होणारा फोन लाँच झाल्याबरोबर कंपनीने भारतात iPhone 17 ची किंमत एकदम वाढवली आहे.किती वाढली किंमत? ऐकून धक्का बसेल. iPhone 17 Price Hike:
iPhone 17 जो आधी 82,900 रुपयांना लाँच झाला होता, तो आता थेट 99,900 रुपयांना झाला आहे. म्हणजेच त्यांची किंमत 17 हजार रुपयांनी वाढली. दरम्यान iPhone Air ची आधीची किंमत 1,19,900 ला होता, आता त्याची किंमत 1,49,900 झाली म्हणजे तब्बल 30 हजार रुपये जास्त द्यावे लागणार.
9 सप्टेंबरला क्युपर्टिनोमध्ये Apple चा ‘Surprise and Shine’ नावाचा मोठा कार्यक्रम झाला . नवीन CEO जॉन टर्नस यांनी स्टेजवर iPhone 18 Pro सीरीज आणि पहिला घडीचा फोन iPhone Duo लाँच केला. शो संपायच्या आतच कंपनीने भारतातल्या जुन्या फोनचे भाव चुपचाप वाढवले. यावेळी Apple ने एक वेगळी चाल खेळली आहे. त्यांनी iPhone 18 चा साधा बेस मॉडेल लाँचच केला नाही.
iPhone Air चा पुढचा फोन पण आणला नाही. म्हणजे आता जर तुम्हाला नवीन iPhone घ्यायचा असेल पण Pro घ्यायचा नसेल, तर तुमच्याकडे iPhone 17 हाच एक पर्याय उरतो. कंपनीला हेच हवं होतं.
iPhone 17 हा Apple चा आजपर्यंतचा सगळ्यात जास्त विकला गेलेला फोन ठरलाय. एकट्या या सीरीजने पहिल्याच वर्षात 170 अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमाई करून दिली आहे. त्यामुळे बेस मॉडेल बंद ठेवून लोकांना परत 17 घ्यायला लावणं, हा त्यांचा प्लॅन आहे. 2027 च्या मध्यापर्यंत iPhone 18 चा साधा मॉडेल येणार नाही असं बोललं जातंय. फक्त एवढंच नाही, Apple ने iPhone 17 Pro आणि 17 Pro Max बनवणं पण बंद केलंय. आता दुकानात जो माल शिल्लक आहे तोच मिळेल, नवीन येणार नाही.खरं तर ही भाववाढ होणार हे आधीच सगळ्यांना वाटत होतं. मेमरी चिप्सचा तुटवडा सगळीकडे आहे, त्यामुळे सगळ्या Android कंपन्यांनी आधीच भाव वाढवले होते.
आता Apple पण त्याच रांगेत आलंय.नेहमीप्रमाणे भारतात iPhone अमेरिकेपेक्षा खूपच महाग आहे. अमेरिकेत iPhone 18 Pro ची किंमत 1199 डॉलर आहे, म्हणजे आपल्याकडे 1 लाख 14 हजार होते. पण भारतात तोच फोन 1,64,900 ला विकतात.
Pro Max अमेरिकेत 1299 डॉलर म्हणजे 1 लाख 23 हजार, पण इथे 1,79,900. 56 हजारचा फरक. नवीन फोल्ड होणारा iPhone Duo तर विचारूच नका. अमेरिकेत तो 1999 डॉलर म्हणजे 1 लाख 90 हजार, पण भारतात त्याची किंमत 2,99,900 ठेवली आहे. एक लाख दहा हजार जास्त.माहितीसाठी सांगायचं तर iPhone 17 Pro लाँच झाला तेव्हा 1,34,900 ला होता आणि Pro Max 1,49,900 ला.
आता त्या दोन्हीवर पण 30 हजार रुपयांची वाढ झाली आहे.थोडक्यात काय, Apple चा नवीन फोन लाँच झाला पण त्याचा फटका जुन्या फोन घेणाऱ्यांनाच बसलाय. जर तुम्ही iPhone 17 घ्यायचा विचार करत असाल तर आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.






