Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Appleचा फोल्डेबल iPhone! ‘या’ नावाने मार्केटमध्ये होणार एन्ट्री; मिळतील फिचर्स अन्…

सध्या टेक जगात Apple पहिल्या फोल्डेबल आयफोनबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. टेक जगात बरीच चर्चा आहे. या नव्या फोन बाबत बरीच उत्सुकता असताना. नुकतेच या नव्या नवख्या फोनबाबत बरेच अहवाल लीक झाले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 15, 2026 | 12:52 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Apple पहिल्या फोल्डेबल आयफोनबद्दल बरीच चर्चा
  • ‘आयफोन अल्ट्रा’ म्हणून त्यांचा पहिला फोल्डेबल फोन लाँच होईल?
  • फोल्डेबल आयफोनची किंमत किती असेल?
Apple iPhone Foldable: Apple आपल्या टेक्नॉलॉजी आणि विविध फिचर्शसाठी ओळखला जातो. सध्या टेक जगात Apple पहिल्या फोल्डेबल आयफोनबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. टेक जगात बरीच चर्चा आहे. या नव्या फोन बाबत बरीच उत्सुकता असताना. नुकतेच या नव्या नवख्या फोनबाबत बरेच अहवाल लीक झाले आहेत. त्यातून या डिव्हाइसबाबत बरीच माहिती उघड झाली आहे. ज्यामध्ये त्याची किंमत, स्टोरेज व्हेरिएंट आणि संभाव्य हार्डवेअर या सगळ्याची सविस्तर स्वरुपात माहिती समोर आली आहे. आतापर्यंत, बहुतेक अहवालांमध्ये त्याचा उल्लेख ‘आयफोन फोल्ड’ म्हणून केला जात होता , परंतु काही नवीन माहितीनुसार, कंपनी हा फोन वेगळ्या नावाने सादर करू शकतात. Apple ने अद्याप या डिव्हाइसची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या चर्चांनुसार, हा फोन या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

पालकांसाठी आनंदाची बातमी! नवजात बालकांच्या श्रवण तपासणीसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू नवजात बाळांच्या श्रवण तपासणीबाबत माहिती देण्यास

नावात बदल होण्याची शक्यता

काही टिपस्टर्सचा असा दावा आहे की Apple iPhone Foldableऐवजी ‘आयफोन अल्ट्रा’ म्हणून त्यांचा पहिला फोल्डेबल फोन लाँच करू शकतात. हे नाव कंपनीच्या सध्याच्या ब्रँडिंग स्ट्रॅटेजीशी जुळतं आहे. कारण अॅपल आधीच अॅपल वॉच अल्ट्रा सारख्या प्रीमियम उत्पादनांसाठी अल्ट्रा नाव वापरत आहे. त्यामुळे जर असं झालं तर हा फोन कंपनीच्या सर्वात प्रीमियम आयफोन मालिकेचा भाग मानला जाऊ शकतो.

किंमत किती असेल?

लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोल्डेबल आयफोन चीनमध्ये तीन वेगवेगळ्या स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. २५६ जीबी मॉडेलची किंमत अंदाजे चिनी युआन १५,९९९ म्हणजे अंदाजे २.१४ लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत अंदाजे चिनी युआन १७,९९९ म्हणजे अंदाजे २.४१ लाख रुपये इतकी असू शकते. १ टीबी स्टोरेज मॉडेलची किंमत अंदाजे चिनी युआन १९,९९९ म्हणजे अंदाजे २.६७ लाख रुपये इतकी असू शकते.

या अहवाल असेही सांगण्यात आलं आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्या किंमती बदलत असतो. म्हणूनच, असा अंदाज आहे की जागतिक बाजारात फोनची सुरुवातीची किंमत सुमारे $1,999 म्हणजे अंदाजे रु. 1.85 लाखपासून सुरू होऊ होण्याची शक्यता आहे. तर मोठ्या स्टोरेज प्रकारांची किंमत ही त्यापेक्षा जास्त असू शकते.

कमी किमतीचे दावेही

इतर लीक्सवरून असेही सूचित होते की फोल्डेबल आयफोनची सुरुवातीची किंमत सुमारे CNY १०,००० म्हणजे अंदाजे १.३४ लाख रुपये इतकी कमी असण्याची शक्यता आहे. पण हा दावा इतर अहवालांपेक्षा बराच वेगळा आहे, म्हणून अद्याप त्याच्याबाबत ठोस सांगता येणे कठीण आहे.

रॅम आणि हार्डवेअर माहिती

रिपोर्ट्सनुसार, या फोनमध्ये १२ जीबी रॅम असू शकते. असे म्हटले जात आहे की सॅमसंग मेमरी मॉड्यूल पुरवू शकते. हे तेच रॅम कॉन्फिगरेशन असू शकते जे अॅपल त्यांच्या काही आगामी प्रीमियम आयफोन मॉडेल्समध्ये देण्याची विचार करत आहे.

LPG History: एलपीजी आला कुठून? कोणी लावला LPGचा शोध, वाचा रंजक इतिहास

प्रीमियम सेगमेंटमध्ये थेट स्पर्धा

जर हा फोल्डेबल आयफोन खरोखरच लाँच झाला, तर तो स्मार्टफोन मार्केटमधील सर्वात महागड्या आणि प्रीमियम डिव्हाइसपैकी एक बनू शकतो आणि फोल्डेबल फोन सेगमेंटमधील विद्यमान ब्रँड्ससमोर एक मोठे आव्हान देखील निर्माण करू शकतो. ही सर्व माहिती सध्या लीक आणि अटकळ म्हणून समोर येत आहे. पण खरं चित्र तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा अॅपल अधिकृतपणे हे डिव्हाइस मार्केटमध्ये आणण्यासाठी त्यांच्यावरचा पडदा टाकेल.

Web Title: Apple iphone ultra foldable device revealed will enter market under this name or price details leaked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • apple
  • Apple Company
  • iphone
  • technology news

संबंधित बातम्या

Flipkart Freedom Sale: तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील्स
1

Flipkart Freedom Sale: तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील्स

TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार
2

TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार

Flipkart Sale 2026: आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्रीडम सेलमध्ये मिळतंय मोठं डिस्काऊंट, ऑफर्स पाहून चकित व्हाल
3

Flipkart Sale 2026: आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्रीडम सेलमध्ये मिळतंय मोठं डिस्काऊंट, ऑफर्स पाहून चकित व्हाल

iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय… नेमकं प्रकरण आहे तरी काय?
4

iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय… नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.