ऑडिओप्रेमींसाठी Apple चे खास सरप्राईज! ANC आणि प्रीमियम फीचर्ससह लाँच केले नवीन Headphones, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती
नवीन AirPods Max 2 मध्ये H2 चिप दिले आहे. यामुळे ऑडियो क्वालिटी आणि एकूणच यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. यासोबतच या नवीन हेडफोनमध्ये अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) देण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या नवीन हेडफोनमधील ANC पूर्वीपेक्षा 1.5 पटच जास्त इफेक्टिव आहे. यामुळे फ्लाईट किंवा पब्लिक ट्रांसपोर्ट सारख्या गर्दीच्या ठिकाणी देखील यूजर्सना अतिशय स्पष्ट आवाज ऐकायला येणार आहे. (फोटो सौजन्य – X)
एवढंच नाही तर AirPods Max 2 मध्ये अपग्रेडेड ऑडियो प्रोसेसिंग देण्यात आली आहे. यामध्ये नवीन हाई डायनामिक रेंज एम्प्लीफायर मिळणार आहे, जो क्लीन आणि डिटेल्ड साउंड ऑफर करतो. हेडफोनमध्ये रिफाइंड ट्रांसपेरेंसी मोड देखील देण्यात आला आहे. नवीन डीएसपी अल्गोरिदम तुम्हाला सभोवतालचे आवाज अधिक नैसर्गिकरित्या ऐकण्यासाठी मदत करतो. USB-C द्वारे हेडफोन कनेक्ट केल्यास 24-bit/48kHz लॉसलेस ऑडियो सपोर्ट देखील ऑफर केला जातो. याशिवाय हेडफोनमध्ये गेमिंग आणि व्हिडीओदरम्यान ऑडियो लेटेंसी अतिशय कमी करण्यात आली आहे.
अॅपलचे AirPods Max 2 भारतात 67,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हेडफोन्स 25 मार्चपासून ऑर्डरसाठी उपलब्ध असणार आहेत. पुढील महिनीच्या सुरुवातीपासून AirPods Max 2 थेट अॅपल स्टोअर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
AirPods Max 2 मध्ये अनेक नवीन इंटेलिजेंट फीचर्सचा देखील जोडण्याच आले आहेत, ज्यामुळे हे डिव्हाईस आणखी स्मार्ट बनते.
अॅडॉप्टिव्ह नॉइज: नवीन हेडफोन त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाच्या हिशोबाने ANC आणि ट्रांसपेरेंसी स्वत: एडजस्ट करू शकतात.
कन्व्हर्सेशन अवेअरनेस: तुम्ही संभाषण सुरु केल्यानंतर म्यूजिकचा आवाज ऑटोमॅटिकली कमी होतो.
वॉइस आइसोलेशन: कॉलदरम्यान तुमचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू जातो आणि बँकग्राऊंड आवाज कमी करण्यासाठी देखील मदत केली जाते.
लाइव ट्रांसलेशन: हेडफोनमध्ये एप्पल इंटेलिजेंसद्वारे रियल-टाइम ट्रांसलेशन सुविधा देखील देण्यात आली आहे.
सिरी जेस्चर कंट्रोल: तसेच, यामध्ये तुम्ही हो किंवा नाही म्हणण्यासाठी मान हलवून सिरीच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.
क्रिएटर फीचर्स: हेडफोनमध्ये असलेल्या डिजिटल क्राउनच्या मदतीने फोटो क्लिक करणं आणि व्हिडीओ रेकॉर्ड कंट्रोल करण्याची सुविधा मिळते.
लिसनिंग प्रोटेक्शन: या नवीन हेडफोन्समध्ये मोठा आवाज कमी करण्याची आणि व्हॉल्यूम आपल्या आवडीनुसार बदलण्याची सोय यांसारखी खास वैशिष्ट्येही आहेत.






