आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती
UIDAI चा हा प्रोग्राम आधार कार्डची सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. UIDAI चा हा बिग बाउंटी प्रोग्राम आधार कार्डची सायबर सिक्योरिटी अधिक मजबूत व्हावी यासाठी सुरु करण्यात आला आहे. यामध्ये अनुभवी साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट्स, एथिकल हॅकर्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यूआईडीएआई ने आधार प्रणाली की सुरक्षा को और मजबूत करने के लिए अपना पहला संरचित बग बाउंटी कार्यक्रम शुरू किया है। अधिक जानकारी के लिए: https://t.co/I72NMK8Vf8 pic.twitter.com/eZ0kPaRMnM — Aadhaar (@UIDAI) March 13, 2026
UIDAI ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नवीन प्रोग्रामबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, आधार कार्डची सुरक्षा आणखी मजबूत व्हावी यासाठी बग बाउंटी प्रोग्राम लाँच करण्यात आला आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी अनुभवी सायबर रिसर्च एक्सपर्ट्स आणि एथिकल हॅकर्सचा एक पॅनल तयार करण्यात आला आहे. हे सायबर सुरक्षा तज्ञ UIDAI च्या प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्ममधील संभाव्य त्रुटी ओळखण्याचा प्रयत्न करणार आहेत.
बग बाउंटी प्रोग्रामच्या पॅनलमधील एक्सपर्ट्सना कोणत्याही वास्तविक सिक्योरिटीमध्ये एखादी त्रुटी आढळली आणि त्यांनी या त्रुटीबाबत रिपोर्ट केले तर त्यांना समस्येच्या गंभीरतेच्या आधारावर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. UIDAI ने सांगितलं आहे की, आधार प्रणाली आणि प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित व मजबूत बनवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
बग बाउंटी प्रोग्राम सुरु करण्यापूर्वी UIDAI ने अलीकडेच एक नवीन आधार अॅप लाँच केला होता. यामध्ये यूजर्सना अनेक सुविधा ऑफर केल्या जात होत्या. यूजर्स घरबसल्या त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी अॅपचा वापर करू शकत होते. यासाठी त्यांना आधार कार्ड सेंटरवर देखील जाण्याची गरज नाही. नवीन आधार ॲप यूजर्सचे आधार कार्ड सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक लॉक आणि डिटेल्स लपवण्याचे पर्याय देखील देते. कार्डधारक आपला आधार क्रमांक शेअर न करता क्यूआर कोडद्वारे कागदविरहित डॉक्यूमेंट वेरिफिकेशन देखील करू शकतात.






