Amazon Great Indian Festival 2025: हीच आहे बेस्ट Deal! आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करा Apple चा Mac Mini 2024
पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या Amazon Great Indian Festival 2025 सेलमध्ये तुम्हाला प्रिमियम आणि महागडे गॅझेट कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Apple चे अनेक प्रिमियम डिव्हाईस सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सेल सुरु होण्यापूर्वीच ऑफर्सबद्दल माहिती समोर आली आहे.
Apple चे नवीन Mac Mini M4 ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक केवळ 47,990 रुपयांच्या किंमतीत बेस Mac Mini M4 खरेदी करू शकणार आहेत. म्हणजेच या डिव्हाईसवर ग्राहकांना लाँच किंमतीपेक्षा तब्बल 10 हजार रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. Mac Mini ऑक्टोबर 2024 मध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. याच्या बेस कॉन्फिगरेशनमध्ये 16GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेज देण्यात आले आहे. याला 24GB रॅम आणि 512GB स्टोरेजपर्यंत अपग्रेड केलं जाऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
23 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हेडफोन, लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्ट टीवी आणि गेमिंग गियरवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. या वस्तूंच्या खरेदीवर SBI कार्डहोल्डर्सना 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. यासोबतच ईएमआय, कूपन आणि एक्सचेंज ऑफर्सचा लाभ घेतल्यास अधिक बचत होणार आहे. या प्लॅटफॉर्मने काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर अर्ली डील देखील सुरू केल्या आहेत.
2024 Mac Mini चे बेस व्हेरिअंट ॲमेझॉनवर 51,990 रुपयांच्या किंमतीत लिस्टेड आहे. या गॅझेटची लाँच किंमत 59,990 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हे गॅझेट अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर ग्राहकांनी अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक किंवा कोटक बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास त्यांना 4 हजार रुपयांचे एडिशनल इंस्टेंट डिस्काउंट देखील ऑफर केलं जाणार आहे. यामुळे या गॅझेटची प्रभावी किंमत 47,999 रुपयांपर्यंत कमी होईल, जी भारतातील या पीसीची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे.
Mac Mini M4 मध्ये Apple चा 3nm प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामध्ये 10 CPU आणि 10 GPU कोर देण्यात आला आहे. यामध्ये रे ट्रेसिंग आणि 16-कोर Neural Engine देखील आहे, जो ऑन-डिवाइस अॅपल इंटेलिजन्सला सपोर्ट करतो. हे डिव्हाईस एकाच वेळी तीन एक्सटर्नल डिस्प्लेना समर्थन देऊ शकते. 2023 Mac Mini च्या तुलनेत, M4 बेस मॉडेल 16GB रॅमसह उपलब्ध आहे, ज्याला 24GB पर्यंत अपग्रेड केले जाऊ शकते. स्टोरेज 256GB एसएसडी पासून सुरू होते आणि 512GB पर्यंत अपग्रेड करता येते. कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये वाय-फाय 6E, ब्लूटूथ 5.3, तीन थंडरबोल्ट 4 पोर्ट, दोन यूएसबी 3 टाइप-सी पोर्ट, एक एचडीएमआय पोर्ट, इथरनेट आणि 3.5mm हेडफोन जॅक यांचा समावेश आहे.