Flipkart Big Billion Days 2025: iPhone 17 खरेदी करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार डिलीव्हरी
पुढील आठवड्यात फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज 2025 सुरु होणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, 23 सप्टेंबरपासून सेल सुरु होणार असून या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा सेल सुरु होण्यापूर्वी कंपनीने आणखी एक घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा आगामी सेल क्विक कॉमर्स आर्म Flipkart Minutes वर देखील लाईव्ह असणार आहे. हि सेवा 24 तास सुरु राहणार आहे.
Flipkart Minutes द्वारे अशी माहिती देण्यात आली आहे की, मोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स, डेली एसेंशियल्स, ब्यूटी, पर्सनल केयर, ग्रॉसरी आणि इतर वस्तूंची डिलीव्हरी केवळ 10 मिनिटांत केली जाणार आहे. एवढंच नाही तर नुकताच लाँच झालेल्या आयफोन 17 ची डिलीव्हरी देखील 10 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे अॅपल स्टोअरवर जाऊन रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. याशिवाय पॉपुलर स्मार्टफोन्स जसे iPhone 16, Samsung Galaxy S24 5G, Motorola Edge 60 Fusion 5G आणि Vivo T4x 5G देखील क्विक डिलीवरी प्लॅटफॉर्मवर कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
लेटेस्ट फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेल 22 सप्टेंबरपासून प्लस आणि ब्लॅक मेंबर्ससाठी सुरु होणार आहे. तर इतर ग्राहकांसाठी हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आगामी सेल केवळ ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरच नाही तर क्विक कॉमर्स आर्म Flipkart Minutes वर देखील लाईव्ह असणार आहे. फ्लिपकार्ट मिनिट्स ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंची 10 मिनिटांत डोरस्टेप डिलीव्हरी देणार आहे. ही सर्विस 19 शहरांमध्ये आणि 3,000 पिन कोडमध्ये उपलब्ध असेल. ईव्हेंटच्या संपूर्ण कालावधीत ही सेवा 24 तास कार्यरत राहील असा दावा केला जात आहे.
Apple चा लेटेस्ट iPhone 17 फ्लिपकार्ट मिनिट्सवर बिग बिलियन डेज सेलदरम्यान उपलब्ध असणार आहे. याशिवाय iPhone 16, Samsung Galaxy S24, Motorola Edge 60 Fusion 5G, iPhone 16 Pro, Samsung Galaxy S24 FE, Oppo K13x, Realme P4, Poco F7, Nothing CMF Phone 2 Pro आणि Vivo T4x 5G सारखे हँडसेट्स देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोनव्यतिरिक्त ऑडियो प्रोडक्ट्स आणि स्मार्टवॉच जसे Apple AirPods Pro (2nd Gen), boAt Aavante Bar 480, Samsung Fit 3 आणि Redmi Move देखील क्विक डिलीवरी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत. ग्राहक Samsung Galaxy Book 4, Fujifilm Instax Mini Film Rolls, Logitech Wireless Mouse आणि iPad A16 देखील इंस्टेंट डिलीवरी प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात. या सर्व वस्तूंच्या डिलीव्हरीसाठी केवळ 10 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज 2025 कधी सुरु होणार आहे?
23 सप्टेंबर 2025
फ्लिपकार्ट मिनिट्स किती वेळात डिलीव्हरी करते?
10 मिनिटे
फ्लिपकार्ट मिनिट्सवरून कोणते स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत?
iPhone 17, iPhone 16, Samsung Galaxy S24, Motorola Edge 60 Fusion 5G, iPhone 16 Pro, Samsung Galaxy S24 FE, Oppo K13x, Realme P4, Poco F7, Nothing CMF Phone 2 Pro आणि Vivo T4x 5G इत्यादी.