iPhone 17 Series: आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी, आजपासून सुरु होणार विक्री! कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त?
iPhone लवर्ससाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज 19 सप्टेंबर रोजी Apple च्या नवीन आणि लेटेस्ट आयफोन 17 सिरीजची विक्री सुरु होणार आहे. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी युजर्स प्रचंड उत्सुक आहेत. नवीन आयफोन 17 सिरीज मॉडेल्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दिल्ली आणि मुंबईतील Apple स्टोअर्सबाहेर गर्दी केली आहे. गेल्या अनेक तासांपासून ग्राहकांनी नवीन आयफोन 17 खरेदी करण्यासाठी रांग लावली आहे. असे देखील काहीजण आहेत, जे रात्री 7 ते 8 वाजल्यापासून आयफोन खरेदी करण्यासाठी रांगेत थांबले आहेत. याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये Apple स्टोअर बाहेर ग्राहकांची मोठी रांग दिसत आहे.
#WATCH | Maharashtra: A large number of people throng the Apple store in Mumbai’s BKC as the company begins its iPhone 17 series sale in India from today pic.twitter.com/f6DOcZC5Yk
— ANI (@ANI) September 19, 2025
ग्राहक आयफोन 17 खरेदी करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. याशिवाय आयफोन 17 च्या पहिल्या विक्रीनिमित्त Apple स्टोअर्स सजवण्यात आले आहेत. मंबईतील पहिल्या Apple स्टोअरचा फोटो टिम कूकने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये Apple स्टोअर अगदी आकर्षक पद्धतीने सजवलेलं पहायला मिळत आहे. हे पाहता, युजर्सनी म्हटलं आहे की जगभरात 535 Apple स्टोअर्स आहेत परंतु टिम कुकने मुंबईतील Apple स्टोअरचा फोटो पोस्ट केला आहे. (फोटो सौजन्य – X)
Can’t wait for tomorrow! pic.twitter.com/VT0Js4DVmU
— Tim Cook (@tim_cook) September 18, 2025
आयपासून आयफोन 17 सिरीजची विक्री सुरु होणार आहे. ही सिरीज 9 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आली असून त्याची प्री ऑर्डर 12 सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आली होती. प्रत्येक देशात आयफोन 17 सिरीजमधील मॉडेल्सची किंमत वेगळी आहे. आता भारतासह इतर देशांमध्ये आयफोन 17 सिरीजमधील मॉडेल्सची किंंमत काय आहे, जाणून घेऊया.
भारतात आयफोन 17 सिरीजमधील बेस मॉडेलच्या 256GB व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे. आयफोन एयरची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये, आयफोन 17 प्रो ची सुरुवातीची किंमत 1,34,900 रुपये आणि 17 प्रो मॅक्स ची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये ठेवण्यात आली आहे.
अमेरिका – अमेरिकेत आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 66,796 रुपये आणि आयफोन एयरची किंमत 83,400 रुपये आहे. तर प्रो मॉडेलची किंमत 91,900 रुपये आणि प्रो मॅक्स मॉडेलची किंमत 99,900 रुपये आहे.
दुबई – दुबईमध्ये आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 62,882 रुपये, आयफोन एयरची किंमत 74,800 रुपये, प्रो मॉडेलची किंमत 91,000 रुपये आणि प्रो मॅक्सची किंमत 99,800 रुपये आहे. ही किंमत भारतापेक्षा खूप कमी आहे.
कॅनडा– कॅनडामध्ये आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 77,110 रुपये, आयफोन एयरची किंमत 98,100 रुपये, प्रो मॉडेलची किंमत 1,08,300 रुपये आणि प्रो मॅक्सची किंमत 1,18,800 रुपये आहे.
ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियामध्ये आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 74,287 रुपये, आयफोन एयरची किंमत 95,600 रुपये, प्रो मॉडेलची किंमत 1,06,100 रुपये आणि प्रो मॅक्सची किंमत 1,16,200 रुपये आहे.
चीन– चीनमध्ये आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 79,786 रुपये, आयफोन एयरची किंमत 1,06,400 रुपये, प्रो मॉडेलची किंमत 1,19,700 रुपये आणि प्रो मॅक्सची किंमत 1,33,000 रुपये आहे.
आयफोन 17 सिरीजच्या खरेदीचा उत्साह सुरु असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. BKC जियो सेंटरवर स्थिर अॅपल स्टोअरच्या बाहेर लोकांमध्ये वाद सुरु झाला आहे. हा वाद विकोपाल जात मारामारी देखील सुरु झालाी. यानंतर या प्रकरणात तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तथापि, कोणीही गंभीर जखमी झाले नाही आणि लवकरच परिस्थिती सामान्य झाली.
VIDEO | iPhone 17 series launch: A scuffle broke out among a few people amid the rush outside the Apple Store at BKC Jio Centre, Mumbai, prompting security personnel to intervene.
Large crowds had gathered as people waited eagerly for the iPhone 17 pre-booking.#iPhone17… pic.twitter.com/cskTiCB7yi
— Press Trust of India (@PTI_News) September 19, 2025